Lokmat Money >शेअर बाजार > Multibagger Stock: ४७ रुपयांचा शेअर १४०० पार; गुंतवणूकदार मालामाल, पाहा कोणता आहे शेअर?

Multibagger Stock: ४७ रुपयांचा शेअर १४०० पार; गुंतवणूकदार मालामाल, पाहा कोणता आहे शेअर?

Pearl Global Industries Multibagger Share: झपाट्यानं बदलणाऱ्या जगात सुपरफास्ट परतावा देणारे शेअर्स फार कमी आहेत. पण या शेअरनं आपल्या गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिलाय.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 13:29 IST2025-02-19T13:28:20+5:302025-02-19T13:29:36+5:30

Pearl Global Industries Multibagger Share: झपाट्यानं बदलणाऱ्या जगात सुपरफास्ट परतावा देणारे शेअर्स फार कमी आहेत. पण या शेअरनं आपल्या गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिलाय.

Pearl Global Industries Multibagger Stock A share of Rs 47 crosses Rs 1400 Investors huge money | Multibagger Stock: ४७ रुपयांचा शेअर १४०० पार; गुंतवणूकदार मालामाल, पाहा कोणता आहे शेअर?

Multibagger Stock: ४७ रुपयांचा शेअर १४०० पार; गुंतवणूकदार मालामाल, पाहा कोणता आहे शेअर?

Pearl Global Industries Multibagger Share: झपाट्यानं बदलणाऱ्या जगात सुपरफास्ट परतावा देणारे शेअर्स फार कमी आहेत. या लिस्टमध्ये एक नाव आहे ते म्हणजे पर्ल ग्लोबल इंडस्ट्रीज. गेल्या काही वर्षांत कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत कमालीची वाढ झाली आहे. या शेअरनं गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिलाय.

६० रुपये होती किंमत

पाच वर्षांपूर्वी पर्ल ग्लोबल इंडस्ट्रीजच्या शेअरची किंमत फक्त ६० रुपये होती. त्यानंतर कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत २२९१ टक्क्यांची वाढ झाली आहे. सहा वर्षांपूर्वी हा शेअर ४७ रुपयांवर व्यवहार करत होता. जो आज १४०० रुपयांचा टप्पा ओलांडण्यात यशस्वी झाला. म्हणजेच या ६ वर्षात कंपनीनं पोझिशनल गुंतवणूकदारांना ३००० टक्क्यांहून अधिक परतावा दिलाय.

कंपनीनं दिलाय उत्तम परतावा

कॅलेंडर वर्ष २०२३ मध्ये कंपनीने २१७ टक्के परतावा दिला. तर २०२२ मध्ये १७ टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. २०२१ मध्ये ७४ टक्के, २०२० मध्ये २९ टक्के आणि २०१९ मध्ये १५ टक्के वाढ झाली होती. मात्र, यंदा शेअर बाजार अडचणीत सापडलाय. या काळात कंपनीच्या शेअर्सच्या किमती तब्बल ३ टक्क्यांनी घसरण झालीये. निफ्टी स्मॉलकॅप १०० निर्देशांक २०२५ मध्ये २० टक्क्यांनी घसरला आहे.

एक लाख रुपयांचे झाले ३१ लाख

६ वर्षांपूर्वी या शेअरमध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना या शेअरने आतापर्यंत ३१ रुपयांचा परतावा दिलाय. ही कंपनी कपड्यांच्या व्यवसायात कार्यरत आहे. महिला, मुलं आणि पुरुषांसाठी कंपनीकडून वेगवेगळी उत्पादनं तयार केली जातात.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Pearl Global Industries Multibagger Stock A share of Rs 47 crosses Rs 1400 Investors huge money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.