Lokmat Money >शेअर बाजार > Paytm चे शेअर्स १००० रुपयांपार; ५२ आठड्यांच्या नीचांकी स्तरापासून २२५% नं वधारले

Paytm चे शेअर्स १००० रुपयांपार; ५२ आठड्यांच्या नीचांकी स्तरापासून २२५% नं वधारले

Paytm Share Price: फिनटेक कंपनी पेटीएमची मूळ कंपनी वन९७ कम्युनिकेशन्सचा शेअर सोमवारी वधारला. पाहा काय आहे यामागील कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 15:10 IST2024-12-09T15:10:57+5:302024-12-09T15:10:57+5:30

Paytm Share Price: फिनटेक कंपनी पेटीएमची मूळ कंपनी वन९७ कम्युनिकेशन्सचा शेअर सोमवारी वधारला. पाहा काय आहे यामागील कारण?

Paytm shares cross Rs 1000 Up 225 percent from 52 week low know reason big deal share sell | Paytm चे शेअर्स १००० रुपयांपार; ५२ आठड्यांच्या नीचांकी स्तरापासून २२५% नं वधारले

Paytm चे शेअर्स १००० रुपयांपार; ५२ आठड्यांच्या नीचांकी स्तरापासून २२५% नं वधारले

Paytm Share Price: फिनटेक कंपनी पेटीएमची मूळ कंपनी वन९७ कम्युनिकेशन्सचा शेअर सोमवारी ३ टक्क्यांनी वधारला आणि ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळी १,००७ रुपयांवर पोहोचला. या वाढीमागे पेपे कॉर्पमधील हिस्सा सॉफ्टबँकेला विकण्याची घोषणा आहे. या वर्षी मे महिन्यात ५२ आठवड्यांच्या नीचांकी ३१० रुपयांच्या तुलनेत हा शेअर २२५ टक्क्यांनी वधारला आहे.

वन९७ कम्युनिकेशन्स सिंगापूर प्रायव्हेट लिमिटेड या त्यांच्या पूर्ण मालकीच्या उपकंपनीच्या संचालक मंडळानं शुक्रवारी, ६ डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत जपानच्या पेपे कॉर्पोरेशनमधील आपले सर्व स्टॉक अधिग्रहण हक्क (एसएआर) सॉफ्टबँक व्हिजन फंड २ एंटिटीला ४१.९ अब्ज येन म्हणजेच २,३६४ कोटी रुपयांमध्ये विकले. 

या कराराद्वारे पेपेचे मूल्य १.०६ JPY आहे असं कंपनीनं एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटलंय. पेटीएम सिंगापूरकडे असलेल्या पेपे एसएआरचे मूल्य ४१.९ अब्ज जेपीवाय आहे. हा व्यवहार डिसेंबर २०२४ मध्ये पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीये.

सलग चौथ्या दिवशी तेजी

पेटीएमच्या शेअरच्या किंमतीत सोमवारी सलग चौथ्या दिवशी वाढ झाली असून या कालावधीत ९.५ टक्क्यांहून अधिक तेजी दिसून आली. आजच्या तेजीमुळे शेअरनं एक हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आणि ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तरही गाठला.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Paytm shares cross Rs 1000 Up 225 percent from 52 week low know reason big deal share sell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.