Share Market Damani Investment : शेअर बाजारात सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या नजरा स्टार गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओकडे असतात. स्टार गुंतवणूकदारांमध्ये कोणते शेअर्स एन्ट्री घेत आहेत, कोणत्या शेअर्सचा त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये समावेश आहे, या सर्व गोष्टींकडे सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे लक्ष असतं.
स्टार इन्व्हेस्ट रमेश दमानी यांचा पोर्टफोलिओ चर्चेत आहे, कारण त्यांच्या पोर्टफोलिओतील काही शेअर्समध्ये बरीच वाढ दिसून येत आहे. दमानी दिग्गज गुंतवणूकदारांपैकी एक आहेत. दमानी हे देशातील अनेक गुंतवणूकदारांसाठी मार्गदर्शक ठरले आहेत.
नेटवर्थ किती?
स्टार गुंतवणूकदार रमेश दमानी लिस्टेड आणि लिस्टेड अशा दोन्ही कंपन्यांमधील गुंतवणुकीसाठी ओळखले जातात. ट्रेंडलाइनच्या आकडेवारीनुसार, ३० सप्टेंबर २०२४ च्या तिमाहीपर्यंत त्यांच्याकडे ४ शेअर्स आहेत आणि त्यांची एकूण संपत्ती १७३.२ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. दमानी यांच्या पोर्टफोलिओची एकूण मालमत्ता मागील तिमाहीच्या तुलनेत ४० टक्क्यांनी घटली आहे. दमानी यांनी गुंतवलेल्या एका शेअरनं २०२४ मध्येच १४३ टक्क्यांपर्यंत परतावा दिलाय. त्यांच्या पोर्टफोलिओवर एक नजर टाकू.
Goldiam International Ltd
शेअरच्या क्वांटीटीचा विचार केला तर त्यांच्याकडे गोल्डियम इंटरनॅशनल कंपनीचे १६,८2,८९८ इक्विटी शेअर्स आहेत, जे ७०.५ कोटी रुपयांच्या होल्डिंग व्हॅल्यूइतके आहेत. बीएसई स्मॉलकॅप लिस्टेड कंपनीचे शेअर्स २०२४ मध्ये आतापर्यंत १४३ टक्क्यांनी वधारले आहेत आणि गेल्या १० वर्षांत त्यात सुमारे ७००० टक्क्यांची वाढ झाली आहे. गोल्डियम इंटरनॅशनलचा शेअर शुक्रवारी १३.९२ टक्क्यांनी वधारून ४१८.७० रुपयांवर बंद झाला.
Panama Petrochem Ltd
दमानी यांच्याकडे पनामा पेट्रोकेमचे २६८ कोटी रुपयांचे ६,७८,४५६ शेअर्स आहेत. पनामा पेट्रोकेमचा शेअर शुक्रवारी ३९४.९५ रुपयांवर बंद झाला आणि कंपनीनं या वर्षी आतापर्यंत १७ टक्के परतावा दिला आहे.
Protean eGov Technologies Ltd
रमेश दमानी यांचा प्रोटीन इगवे टेक्नॉलॉजीमध्ये सर्वात मोठा हिस्सा आहे. त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये या कंपनीचे ४,२२,०६९ शेअर्स आहेत. गेल्या वर्षी आयपीओनंतर कंपनीनं शेअर बाजारात एन्ट्री घेतली होती. २०२४ मध्ये कंपनीच्या शेअर्सनं ४०.७८ टक्के परतावा दिला. कंपनीचा शेअर शुक्रवारी १,७७५.२० रुपयांवर बंद झाला. याशिवाय Vadivarhe Speciality Chemicals Ltd चे त्यांच्याकडे १,८९,००० शेअर्स आहेत.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)