Lokmat Money >शेअर बाजार > Ola Electric चा शेअर ५० रुपयांच्याही खाली, गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ; ६५% पेक्षा अधिक आपटला

Ola Electric चा शेअर ५० रुपयांच्याही खाली, गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ; ६५% पेक्षा अधिक आपटला

Ola Electric Share Price: ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीचे शेअर ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचलेत. एका अपडेटनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ही मोठी घसरण झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 11:45 IST2025-03-17T11:44:02+5:302025-03-17T11:45:55+5:30

Ola Electric Share Price: ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीचे शेअर ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचलेत. एका अपडेटनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ही मोठी घसरण झाली आहे.

Ola Electric shares fall below Rs 50 52 weeks low investors huge loss fell more than 65 percent | Ola Electric चा शेअर ५० रुपयांच्याही खाली, गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ; ६५% पेक्षा अधिक आपटला

Ola Electric चा शेअर ५० रुपयांच्याही खाली, गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ; ६५% पेक्षा अधिक आपटला

Ola Electric Share Price: ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या शेअरमध्ये सोमवारी मोठी घसरण झाली. सोमवारी बीएसईवर कंपनीचा शेअर ५ टक्क्यांहून अधिक घसरून ४७.८० रुपयांवर आला. ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीचे शेअर ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचलेत. एका अपडेटनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ही मोठी घसरण झाली आहे. रॉसमर्टा डिजिटल सर्व्हिसेसनं (Rosmerta Digital Services) त्यांच्या पूर्ण मालकी हक्क असलेल्या ओला इलेक्ट्रिक टेक्नॉलॉजीज विरोधात दिवाळखोरी याचिका दाखल केली असल्याचं ओला इलेक्ट्रिकनं एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटलं.

पेमेंट डिफॉल्टशी संबंधित प्रकरण

रॉसमर्टा डिजिटल सर्व्हिसेसनं एनसीएलटीच्या बंगळूरू खंडपीठात ही याचिका दाखल केलीये.  रोझमर्टा डिजिटल सर्व्हिसेस ही ओलाची ऑपरेशनल क्रेडिटर आहे. रोस्मार्टा डिजिटल सर्व्हिसेसनं पुरवलेल्या सेवांसाठी कथितरित्या देयक चुकल्याची तक्रार केली असून ओला इलेक्ट्रिक टेक्नॉलॉजीज विरोधात कॉर्पोरेट दिवाळखोरी निवारण प्रक्रिया (सीआयआरपी) सुरू करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, कंपनीनं याबाबत योग्य तो कायदेशीर सल्ला घेतला असल्याचं ओला इलेक्ट्रिकनं म्हटलं.

६५% टक्क्यांपेक्षा अधिक घसरण

ओलाचे शेअर्स काही महिन्यांत मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. ओला इलेक्ट्रिकचा शेअर ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवरून ६५ टक्क्यांहून अधिक घसरलाय. २० ऑगस्ट २०२४ रोजी ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीचा शेअर १५७.५३ रुपयांवर व्यवहार करत होता. कंपनीचा शेअर १७ मार्च २०२५ रोजी ४७.८० रुपयांवर पोहोचला. कंपनीचे शेअर्स त्यांच्या आयपीओ किमतीपेक्षा खाली आले आहेत. 

आयपीओमध्ये कंपनीच्या शेअरची किंमत ७६ रुपये होती. ओला इलेक्ट्रिकचा आयपीओ २ ऑगस्ट २०२४ रोजी बोलीसाठी खुला झाला आणि ६ ऑगस्टपर्यंत खुला राहिला. ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीचा आयपीओ एकूण ४.४५ पट सब्सक्राइब झाला होता. कंपनीच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा ४.०५ पट सब्सक्राइब करण्यात आला होता.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Ola Electric shares fall below Rs 50 52 weeks low investors huge loss fell more than 65 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.