Lokmat Money >शेअर बाजार > ट्रम्प टॅरिफच्या धक्क्यातूनही ओला इलेक्ट्रिकची उसळी; शेअरचा भाव ४७ टक्के वाढला; 'हा' निर्णय ठरला गेमचेंजर

ट्रम्प टॅरिफच्या धक्क्यातूनही ओला इलेक्ट्रिकची उसळी; शेअरचा भाव ४७ टक्के वाढला; 'हा' निर्णय ठरला गेमचेंजर

Ola Electric Shares: पहिल्या तिमाहीत ओला कंपनीला तोटा सहन करावा लागला आहे. मात्र, त्यानंतरही गुंतवणूकदारांनी कंपनीवर विश्वास ठेवला असल्याचे दिसत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 14:05 IST2025-09-01T13:52:42+5:302025-09-01T14:05:06+5:30

Ola Electric Shares: पहिल्या तिमाहीत ओला कंपनीला तोटा सहन करावा लागला आहे. मात्र, त्यानंतरही गुंतवणूकदारांनी कंपनीवर विश्वास ठेवला असल्याचे दिसत आहे.

Ola Electric Share Price Rallies 47% in a Month, Defies Market Downturn | ट्रम्प टॅरिफच्या धक्क्यातूनही ओला इलेक्ट्रिकची उसळी; शेअरचा भाव ४७ टक्के वाढला; 'हा' निर्णय ठरला गेमचेंजर

ट्रम्प टॅरिफच्या धक्क्यातूनही ओला इलेक्ट्रिकची उसळी; शेअरचा भाव ४७ टक्के वाढला; 'हा' निर्णय ठरला गेमचेंजर

Ola Electric Shares Rally : एकिकडे ट्रम्प यांच्या उच्च टॅरिफमुळे अनेक कंपन्यांच्या शेअर्सवर दबाव दिसून येत आहे. दिग्गज कंपन्यांच्या भांडवलात मोठी घसरण होत आहे. अशा परिस्थितीत ओला इलेक्ट्रिकच्या शेअरने सातत्याने उसळी घेतली आहे. सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात कंपनीचा शेअर ७.३३% ने वाढून ५८.०१ रुपयांच्या पातळीवर पोहोचला. म्हणजेच, मागील पाच ट्रेडिंग सत्रांमध्येच ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये सुमारे २०% ची तेजी दिसून आली आहे, तर गेल्या ३० दिवसांत हा शेअर ४७% पर्यंत वाढला आहे.

तेजी का आली?
या तेजीमागे एक मोठे कारण आहे. ओला इलेक्ट्रिकच्या Gen-3 स्कूटर रेंजला उत्पादन संलग्न प्रोत्साहन (PLI) योजनेअंतर्गत मान्यता मिळाली आहे. या योजनेमुळे कंपनीला आपल्या विक्रीवर १३% ते १८% पर्यंतचा फायदा मिळू शकतो आणि हा लाभ २०२८ पर्यंत सुरू राहू शकतो. कंपनीचे म्हणणे आहे की, या निर्णयामुळे केवळ खर्च कमी होणार नाही, तर नफ्यातही वाढ होईल.

ओलाच्या मते, तिच्या Gen-3 स्कूटर लाइनअपचा कंपनीच्या एकूण विक्रीत ५०% पेक्षा जास्त हिस्सा आहे. आता Gen-2 आणि Gen-3 या दोन्ही रेंजला हे प्रमाणपत्र मिळाल्यामुळे, व्यवसायात आणखी स्थिरता आणि तेजी येण्याची अपेक्षा आहे. कंपनीने असेही म्हटले आहे की, या उपक्रमाचा ईबीआयडीए स्तरावर सकारात्मक परिणाम दिसून येईल.

वाचा - सरकारी निर्णयाचा फटका! 'ही' कंपनी ६० कर्मचाऱ्यांना दाखवणार बाहेरचा रस्ता; CEO म्हणाले दुसरा पर्याय नाही

पहिल्या तिमाहीत तोटा
मात्र, जून तिमाहीच्या निकालांमध्ये कंपनीला अजूनही नुकसान सहन करावे लागत आहे. या तिमाहीत ओला इलेक्ट्रिकचा तोटा वाढून ४२८ कोटी रुपये झाला, तर गेल्या वर्षी याच तिमाहीत हे नुकसान ३४७ कोटी रुपये होते. कंपनीचा महसूलही वार्षिक आधारावर ५०% ने कमी होऊन *८२८ कोटी रुपये राहिला, जो गेल्या वर्षी याच कालावधीत १,६४४ कोटी रुपये होता.

Web Title: Ola Electric Share Price Rallies 47% in a Month, Defies Market Downturn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.