Stock Market Holiday 2026 : साल २०२५ आता आपल्या अंतिम टप्प्यात आले आहे. आज, गुरुवार २५ डिसेंबर रोजी ख्रिसमस निमित्त भारतीय शेअर बाजारात वर्षातील शेवटची 'ट्रेडिंग सुट्टी' आहे. राष्ट्रीय शेअर बाजार आणि मुंबई शेअर बाजारात आज कोणतेही व्यवहार होणार नाहीत. दरम्यान, गुंतवणूकदारांना नवीन वर्षाचे नियोजन करता यावे यासाठी एनएसईने वर्ष २०२६ मधील सार्वजनिक सुट्ट्यांची अधिकृत यादी जाहीर केली आहे.
आज बाजार पूर्णपणे बंद
ख्रिसमसच्या सुट्टीमुळे आज इक्विटी, डेरिव्हेटिव्ह्स आणि करन्सी सेगमेंटमध्ये व्यापार बंद आहेत. तसेच मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्येही आज व्यवहार होणार नाहीत. नियमित शनिवार आणि रविवारच्या साप्ताहिक सुट्ट्या वगळता, आजची सुट्टी ही या वर्षातील शेवटची सार्वजनिक सुट्टी ठरली आहे.
२०२६ मधील शेअर बाजाराच्या १५ सुट्ट्या
एनएसईने जाहीर केलेल्या कॅलेंडरनुसार, आगामी २०२६ सालात एकूण १५ दिवस ट्रेडिंग बंद राहणार आहे. याव्यतिरिक्त दर शनिवार आणि रविवारी साप्ताहिक सुट्टी असेल.
वर्ष २०२६ मधील सुट्ट्यांचे वेळापत्रक
| महिना | तारीख | सुट्टीचे कारण |
| जानेवारी | २६ जानेवारी | प्रजासत्ताक दिन (वर्षातील पहिली सुट्टी) |
| मार्च | ३ मार्च | होळी |
| मार्च | २६ | श्री रामनवमी |
| मार्च | ३१ | श्री महावीर जयंती |
| एप्रिल | ३ एप्रिल | गुड फ्रायडे |
| एप्रिल | १४ एप्रिल | डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती |
| मे | १ मे | महाराष्ट्र दिन |
| मे | २८ मे | बकरी ईद |
| जून | २६ जून | मुहर्रम |
| सप्टेंबर | १४ सप्टेंबर | गणेश चतुर्थी |
| ऑक्टोबर | २ ऑक्टोबर | महात्मा गांधी जयंती |
| ऑक्टोबर | २० ऑक्टोबर | दसरा |
| नोव्हेंबर | १० नोव्हेंबर | दिवाळी - बलिप्रतिपदा |
| नोव्हेंबर | २४ नोव्हेंबर | गुरुनानक जयंती |
| डिसेंबर | २५ डिसेंबर | ख्रिसमस (वर्षातील शेवटची सुट्टी) |
वाचा - एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
महत्त्वाच्या नोंदी
नव्या वर्षातील बाजाराची पहिली सुट्टी २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन) रोजी असेल, तर वर्षाचा समारोप २५ डिसेंबर (ख्रिसमस) च्या सुट्टीने होईल. या काळात शेअर बाजारासोबतच कमोडिटी आणि करन्सी मार्केटमध्येही सुट्ट्यांचे नियम लागू राहतील.
