Stock Market Holiday 2026 List: नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि मुंबई शेअर बाजारानं (BSE) २०२६ सालासाठीचे अधिकृत ट्रेडिंग हॉलिडे कॅलेंडर प्रसिद्ध केलं आहे. यानुसार, वर्ष २०२६ मध्ये भारतीय इक्विटी मार्केट एकूण १५ दिवस बंद राहणार आहे. या सुट्ट्या विविध महिन्यांत विभागलेल्या असून, यामध्ये राष्ट्रीय सण आणि सांस्कृतिक उत्सवांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, यावर्षी सात 'लाँग वीकेंड' (Long Weekends) येत आहेत, कारण अनेक सुट्ट्या शुक्रवार किंवा सोमवारी आल्या आहेत.
२०२६ मधील प्रमुख सुट्ट्यांची यादी
२६ जानेवारी (सोमवार): प्रजासत्ताक दिन
३ मार्च (मंगळवार): होळी
२६ मार्च (गुरुवार): श्री रामनवमी
३१ मार्च (मंगळवार): श्री महावीर जयंती
३ एप्रिल (शुक्रवार): गुड फ्रायडे
१४ एप्रिल (मंगळवार): डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
१ मे (शुक्रवार): महाराष्ट्र दिन
२८ मे (गुरुवार): बकरी ईद
२६ जून (शुक्रवार): मोहरम
१४ सप्टेंबर (सोमवार): गणेश चतुर्थी
२ ऑक्टोबर (शुक्रवार): महात्मा गांधी जयंती
२० ऑक्टोबर (मंगळवार): दसरा
१० नोव्हेंबर (मंगळवार): दिवाळी-बलिप्रतिपदा
२४ नोव्हेंबर (मंगळवार): गुरु नानक देव जयंती
२५ डिसेंबर (शुक्रवार): ख्रिसमस
मुहूर्त ट्रेडिंग सत्राचे आयोजन
महाशिवरात्री (१५ फेब्रुवारी), ईद-उल-फितर (२१ मार्च), स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट) आणि दिवाळी लक्ष्मीपूजन (८ नोव्हेंबर) हे सण शनिवार किंवा रविवारी आल्यामुळे त्या दिवशी बाजार वेगळा बंद राहणार नाही. तथापि, ८ नोव्हेंबर २०२६ रोजी रविवार असूनही सामान्य ट्रेडिंग बंद राहील, मात्र संध्याकाळी पारंपारिक 'मुहूर्त ट्रेडिंग' सत्राचे आयोजन केले जाईल.
