Lokmat Money >शेअर बाजार > १०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?

१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?

कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण झाल्यानंतर या शेअरमध्ये गुंतवणूक करणं योग्य ठरेल का? पाहूया काय म्हणताहेत तज्ज्ञ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 15:33 IST2025-09-13T15:33:14+5:302025-09-13T15:33:14+5:30

कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण झाल्यानंतर या शेअरमध्ये गुंतवणूक करणं योग्य ठरेल का? पाहूया काय म्हणताहेत तज्ज्ञ?

NSDL stock has fallen by 10 percent but is still 60 percent above the IPO price What did the experts say | १०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?

१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?

NSDL Target Price: शुक्रवारी बाजार बंद होताना नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडचे ​​शेअर्स ०.८७ टक्क्यांनी घसरल्यानंतर १२८०.६५ रुपयांवर बंद झाले. ११ ऑक्टोबर २०२५ रोजी एनएसडीएलचे शेअर्स १४२५ रुपयांच्या पातळीवर पोहोचले होते. परंतु तेव्हापासून शुक्रवारच्या बंद होईपर्यंत कंपनीच्या शेअर्सची किंमत १० टक्क्यांनी घसरली आहे. दरम्यान, त्यानंतरही, हा शेअर ८०० रुपयांच्या इश्यू किमतीपेक्षा ६०.०८ टक्क्यांहून अधिक वाढीनं व्यवहार करत आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण झाल्यानंतर या शेअरमध्ये गुंतवणूक करणं योग्य ठरेल का? चला जाणून घेऊया तज्ज्ञांचं मत...

एनएसडीएलची आर्थिक स्थिती कशी?

मुंबईतील या कंपनीचा निव्वळ नफा पहिल्या तिमाहीत १५.१६ टक्क्यांनी वाढला आहे. एप्रिल ते जून या काळात एनएसडीएलचा निव्वळ नफा ८९.६२ कोटी रुपये होता. एक वर्षापूर्वी, याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा ७७.८२ कोटी रुपये होता. कंपनीच्या महसुलात वाढ झाली असली तरी, महसूल आघाडीवर एनएसडीएलला मोठा धक्का बसलाय. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा महसुल ३१२.०२ कोटी रुपये होता. वार्षिक आधारावर, कंपनीचा महसूल ७.४९ टक्क्यांनी कमी झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एनएसडीएलचा महसूल ३३७.२९ कोटी रुपये होता. पहिल्या तिमाहीत एनएसडीएलचा खर्च २२८.०३ कोटी रुपये होता.

सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश

काय म्हणाले एक्सपर्ट?

बिझनेस टुडेच्या रिपोर्टनुसार, तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, हा शेअर घसरणीत खरेदी केला जाऊ शकतो. एक्सपर्ट्सनं याला १२५० रुपयांची सपोर्ट प्राईज दिली आहे. १३३५ रुपयांचा रेसिस्टेंस आहे. यावर गेल्यास एनएसडीएलचा शेअर १४०० रुपयांच्या लेव्हलवर जाऊ शकतो असा अंदाजही तज्ज्ञांनी व्यक्त केलाय.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घएणं आवश्यक आहे.)

Web Title: NSDL stock has fallen by 10 percent but is still 60 percent above the IPO price What did the experts say

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.