Lokmat Money >शेअर बाजार > NSDL Share Price: 'या' IPO चे गुंतवणुदार झाले मालामाल; ४ दिवसांत ७८% चा छप्परफाड रिटर्न; लिस्टिंगनंतर लागला जॅकपॉट

NSDL Share Price: 'या' IPO चे गुंतवणुदार झाले मालामाल; ४ दिवसांत ७८% चा छप्परफाड रिटर्न; लिस्टिंगनंतर लागला जॅकपॉट

NSDL IPO: या IPO मध्ये गुंतवणूक केलेल्या आणि वाटप झालेल्या गुंतवणुकदारांना मोठा लॉटरी लागली आहे. खरं तर, या IPO ने लिस्टिंगपासून सलग चौथ्या दिवशी उत्तम परतावा दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 13:20 IST2025-08-11T13:20:49+5:302025-08-11T13:20:49+5:30

NSDL IPO: या IPO मध्ये गुंतवणूक केलेल्या आणि वाटप झालेल्या गुंतवणुकदारांना मोठा लॉटरी लागली आहे. खरं तर, या IPO ने लिस्टिंगपासून सलग चौथ्या दिवशी उत्तम परतावा दिला आहे.

NSDL Share Price Investors of this IPO became rich 78 percent breaking return in 4 days Jackpot hit after listing investors | NSDL Share Price: 'या' IPO चे गुंतवणुदार झाले मालामाल; ४ दिवसांत ७८% चा छप्परफाड रिटर्न; लिस्टिंगनंतर लागला जॅकपॉट

NSDL Share Price: 'या' IPO चे गुंतवणुदार झाले मालामाल; ४ दिवसांत ७८% चा छप्परफाड रिटर्न; लिस्टिंगनंतर लागला जॅकपॉट

NSDL IPO: नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडच्या (NSDL) IPO मध्ये गुंतवणूक केलेल्या आणि वाटप झालेल्या गुंतवणुकदारांना मोठा लॉटरी लागली आहे. खरं तर, या IPO ने लिस्टिंगपासून सलग चौथ्या दिवशी उत्तम परतावा दिला आहे. NSDL चा IPO ६ ऑगस्ट रोजी १०% प्रीमियमवर लिस्ट झाला होता. या आयपीओमध्ये शेअरची किंमत ८०० रुपये होती आणि तो ८८० रुपयांवर लिस्ट झाला होता. फक्त ४ दिवसांत, NSDL चा शेअर १४२५ रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. BSE वर या शेअरने ९.५९ टक्क्यांच्या वाढीसह १,४२५ रुपयांचा नवीन विक्रम केला आहे. अशाप्रकारे, या आयपीओनं त्याच्या गुंतवणूकदारांना ४ दिवसांत ७८% चा प्रचंड परतावा दिला आहे.

गुंतवणूकदारांनी काय करावं?

अनेक बाजार तज्ज्ञ लहान गुंतवणूकदारांना प्रॉफिट बुक करण्याचा सल्ला देत आहेत. त्याच वेळी, काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे की दीर्घकालीन गुंतवणूकदार या स्टॉकमध्ये राहू शकतात. डिपॉझिटरी सेवा क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीला आयपीओ दरम्यान गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. एनएसडीएलचा आयपीओ ४१ पटींपेक्षा जास्त सबस्क्राइब झाला होता. हा इश्यू ३० जुलै ते १ ऑगस्ट दरम्यान बोलीसाठी खुला होता.

भारताला 'डेड इकॉनॉमी' म्हणणाऱ्या ट्रम्प यांचा 'डॉलर'च धोक्यात; एक्सपर्टनं दिला मोठा इशारा

का येतेय तेजी?

बाजारातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे की अनेक गुंतवणूकदारांना आयपीओमध्ये संधी मिळाली नाही. आता ते हे स्टॉक खरेदी करत आहेत. त्याच वेळी, एनएसडीएल आणि सीडीएसएलची डिपॉझिटरी व्यवसायात मक्तेदारी आहे. यामुळे गुंतवणुकदारांचा या कंपनीवरील विश्वास अबाधित राहतो. एनएसडीएल १२ ऑगस्ट रोजी तिमाही निकाल जाहीर करेल. याआधीही खरेदी दिसून येत आहे. यामुळे स्टॉकमध्ये तेजी दिसून येत आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: NSDL Share Price Investors of this IPO became rich 78 percent breaking return in 4 days Jackpot hit after listing investors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.