Lokmat Money >शेअर बाजार > NSDL IPO: बहुप्रतीक्षित एनएसडीएल आयपीओचा प्राईज बँड निश्चित; GMP किती, कधीपासून गुंतवणूक करू शकता? जाणून घ्या

NSDL IPO: बहुप्रतीक्षित एनएसडीएल आयपीओचा प्राईज बँड निश्चित; GMP किती, कधीपासून गुंतवणूक करू शकता? जाणून घ्या

NSDL IPO Price band: नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीच्या (NSDL) IPO चा प्राईज बँड निश्चित करण्यात आला आहे. जाणून घ्या कधीपासून गुंतवणूक करता येणार.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 10:21 IST2025-07-25T10:20:20+5:302025-07-25T10:21:07+5:30

NSDL IPO Price band: नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीच्या (NSDL) IPO चा प्राईज बँड निश्चित करण्यात आला आहे. जाणून घ्या कधीपासून गुंतवणूक करता येणार.

NSDL IPO Price band of much awaited nsdl ipo price band fixed what is the GMP lot size know details | NSDL IPO: बहुप्रतीक्षित एनएसडीएल आयपीओचा प्राईज बँड निश्चित; GMP किती, कधीपासून गुंतवणूक करू शकता? जाणून घ्या

NSDL IPO: बहुप्रतीक्षित एनएसडीएल आयपीओचा प्राईज बँड निश्चित; GMP किती, कधीपासून गुंतवणूक करू शकता? जाणून घ्या

NSDL IPO Price band: नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीच्या (NSDL) IPO चा प्राईज बँड निश्चित करण्यात आला आहे. कंपनीनं आयपीओसाठी प्राईज बँड ७६० ते ८०० रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आलाय. कंपनीनं १८ शेअर्सचा एक मोठा लॉट तयार केला आहे. ज्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांना किमान १४,४०० रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. कोणताही किरकोळ गुंतवणूकदार जास्तीत जास्त १३ लॉटमध्ये पैसे गुंतवू शकतो.

कंपनीनं कर्मचाऱ्यांना प्रति शेअर ७६ रुपयांची सूट दिली आहे. एनएसडीएलचा आयपीओ ३० जुलै ते १ ऑगस्ट दरम्यान खुला असेल.

शेअर बाजारात मोठी घसरण, ३०० अंकांपेक्षा जास्त घसरण; Nifty २५००० च्या खाली, NBFC Stocks आपटले

स्वस्त आहे प्राईज बँड?

एनएसडीएल सध्या अनलिस्टेड मार्केटमध्ये १०२५ रुपयांवर व्यवहार करत आहे. मनी कंट्रोलच्या वृत्तानुसार, प्राईज बँड अनलिस्टेड मार्केटच्या तुलनेत स्वस्त आहे. १२ जून रोजी तो १२७५ रुपयांवर व्यवहार करत होता. या आयपीओची इश्यू प्राईज त्यावेळच्या तुलनेत २० टक्क्यांनी कमी आहे. एखाद्या लोकप्रिय कंपनीचा प्राईज बँड एखाद्या अनलिस्टेड बाजारपेठेपेक्षा कमी असण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी, एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस, टाटा टेक्नॉलॉजीज, एजीएस ट्रान्झॅक्ट, यूटीआय अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी आणि पीडी फिनटेकची इश्यू प्राईज अनलिस्टेड बाजारभावापेक्षा कमी ठेवण्यात आली होती.

ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत (NSDL IPO GMP Today)

इन्व्हेस्टर्स गेनच्या अहवालानुसार, या आयपीओमुळे ग्रे मार्केटमध्ये १६७ रुपयांचा प्रीमियम फायदा दाखवत आहे. या आयपीओचा सर्वात कमी जीएमपी १३८ रुपयांच्या प्रीमियमवर व्यवहार करत आहे.

कोणासाठी किती हिस्सा राखीव?

या IPO मधील जास्तीत जास्त ५० टक्के हिस्सा QIB श्रेणीमध्ये राखीव ठेवला जाईल. त्याच वेळी, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी किमान ३५ टक्के हिस्सा राखीव ठेवला जाईल. तर, किमान १५ टक्के हिस्सा NII श्रेणीमध्ये राखीव ठेवला जाईल. एनएसडीएलच्या आयपीओचा आकार ४०११.६० कोटी रुपये आहे. कंपनी आयपीओद्वारे ५.०१ कोटी शेअर्स जारी करेल. हा शेअर ऑफर फॉर सेल अंतर्गत जारी केला जाईल.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोमत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: NSDL IPO Price band of much awaited nsdl ipo price band fixed what is the GMP lot size know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.