Stock Market News: देशांतर्गत शेअर बाजारात आज ९ जानेवारी रोजी निफ्टीच्या विकली एक्सपायरीचा दिवस असून व्यवहाराची सुरुवात घसरणीसह झाली. सेन्सेक्स ३२ अंकांनी, निफ्टी २५ अंकांनी तर बँक निफ्टी ११० अंकांनी घसरला. पण त्यानंतर बाजारात आणखी घसरण सुरू झाली. मिडकॅप निर्देशांक फ्लॅट होता.
सेन्सेक्स ७८,२०६ च्या पातळीवर उघडला, पण नंतर ७७,८८० च्या पातळीवर घसरला. तर निफ्टी २३,६७४ वर उघडला आणि २३,६०७ च्या पातळीवर आला. बँक निफ्टी ४९,७१२ च्या पातळीवर उघडला, पण नंतर तो ४९,४८६ च्या पातळीवर घसरला.
लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
निफ्टीवरील ऑटो आणि मीडिया निर्देशांक वगळता इतर सर्व निर्देशांक रेज झोनमघ्ये होते. रिअल्टी, पीएसयू बँक, कन्झ्युमर ड्युरेबल्समध्ये सर्वाधिक घसरण नोंदविण्यात आली. कोटक बँक, बजाज ऑटो, हिंडाल्को, महिंद्रा अँड महिंद्रा, श्रीराम फायनान्स या शेअरमध्ये तेजी दिसून आली. एलटी, एसबीआय, ट्रेंट, बीपीसीएल, ओएनजीसी यांचे शेअर्स घसरले.गेल्या आठवड्यात निफ्टीच्या विकली एक्सपायरीमुळे बाजारात प्रचंड तेजी दिसून आली. आजच्या राशींबद्दल बोलायचं झालं तर थोडीशी कमकुवत चिन्हे आहेत.
आजपासून तिसऱ्या तिमाहीचा हंगाम सुरू होत आहे, त्यामुळे आता बाजारातही या ट्रिगरमुळे अॅक्शन पाहायला मिळणार आहे. आज संध्याकाळी टीसीएसच्या निकालाने निकालाचा हंगाम सुरू होईल. फ्युचर्समध्ये टाटा एलेक्सी आणि कॅशमध्ये इरेडा देखील येईल.