Lokmat Money >शेअर बाजार > बंपर कमाई करुन देणार 'हा' 75 रुपयांचा पीएसयू स्टॉक, ब्रोकरेजने दिले वाढीचे संकेत

बंपर कमाई करुन देणार 'हा' 75 रुपयांचा पीएसयू स्टॉक, ब्रोकरेजने दिले वाढीचे संकेत

NHPC Share Price: कंपनीला नवीन प्रकल्प मिळाले असून, सध्याचे प्रकल्पही पूर्णत्वास आले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 19:51 IST2025-02-20T19:51:05+5:302025-02-20T19:51:34+5:30

NHPC Share Price: कंपनीला नवीन प्रकल्प मिळाले असून, सध्याचे प्रकल्पही पूर्णत्वास आले आहेत.

NHPC Share Price: This Rs 75 PSU stock will provide bumper earnings, brokerage gives rise signal | बंपर कमाई करुन देणार 'हा' 75 रुपयांचा पीएसयू स्टॉक, ब्रोकरेजने दिले वाढीचे संकेत

बंपर कमाई करुन देणार 'हा' 75 रुपयांचा पीएसयू स्टॉक, ब्रोकरेजने दिले वाढीचे संकेत

NHPC Share Price: सरकारी जलविद्युत कंपनी NHPC च्या शेअर्समध्ये गुरुवारी मोठी वाढ झाली. आजच्या व्यवहारात या शेअरमध्ये 8% ची दमदार वाढ नोंदवली गेली. बुधवारी हा स्टॉक 74.60 च्या पातळीवर बंद झाला होता, तर गुरुवारी या शेअरने 80.39 रुपयांचा इंट्राडे उच्चांक गाठला. ग्लोबल ब्रोकरेज फर्म CLSA ने NHPC चे रेटिंग 'Acumulate' वरून 'BUY' वर अपग्रेड केले आहे. 

शेअर दुप्पट होणार
ब्रोकरेजचा असा विश्वास आहे की, NHPC शेअर्समध्ये पुढील 4 वर्षांत दुप्पट वाढ होण्याची क्षमता आहे. गेल्या 6 महिन्यांत स्टॉकमध्ये 25% ची सुधारणा झाली आहे, त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी येथे चांगली संधी बनू शकते.

NHPC साठी मोठा ट्रिगर
ब्रोकरेजचे म्हणणे आहे की, कंपनीचे नवीन प्रकल्प आणि ROE (रिटर्न ऑन इक्विटी) मधील सुधारणा यासाठी मोठे ट्रिगर ठरू शकतात. NHPC चा भारताच्या जल क्षमतेमध्ये 15% वाटा आहे, तर 67% बांधकामाधीन प्रकल्पांमध्ये आहे. NHPC आता पंप केलेल्या स्टोरेज प्रकल्पांमध्येही पाऊल टाकत आहे, ज्यामुळे कमाई वाढ्याची अपेक्षा आहे. कंपनीचा महत्त्वाचा पार्वती-2 प्रकल्प Q4FY25 मध्ये पूर्ण क्षमतेने उत्पादन सुरू होण्याची शक्यता आहे. 

अक्षय ऊर्जेचा विस्तार
NHPC ची अक्षय ऊर्जा ब्रांच पुढील 2 वर्षात शेअर बाजारात लिस्ट होण्याची योजना आहे. यामुळे कंपनीला दीर्घकालीन वाढीचा फायदा होईल आणि गुंतवणूकदारांचा विश्वास बळकट होईल. NHPC शेअर्समध्ये झालेली ही वाढ आणि CLSA च्या सकारात्मक अहवालानंतर गुंतवणूकदारांचा कल शेअर्सकडे वळू शकतो. नवीन प्रकल्प आणि जलविद्युत क्षेत्रातील ताकद यामुळे एनएचपीसीला येत्या काही वर्षांत मोठा नफा मिळण्याची अपेक्षा आहे.

(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: NHPC Share Price: This Rs 75 PSU stock will provide bumper earnings, brokerage gives rise signal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.