IPO Launched today :शेअर बाजारातगुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या काही महिन्यांत शेअर बाजारात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या आठवड्यात 6 IPO येत आहेत, यापैकी एक मेनबोर्ड विभागातील असेल, तर उर्वरित पाच MSME विभागातील असतील. यंदा IPO च्या माध्यमातून 2 लाख कोटी रुपयांहून अधिक कमाई होण्याची अपेक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, सुमारे 100 कंपन्यांनी IPO साठी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) कडे कागदपत्रे सादर केली आहेत.
Standard Glass Lining IPO
अभियांत्रिकी उपकरणे बनवणारी कंपनी Standard Glass Lining IPO टेक्नॉलॉजीचा IPO 6 जानेवारी रोजी उघडेल आणि 8 जानेवारी रोजी बंद होईल. कंपनीच्या IPO चा आकार रु 410.05 कोटी आहे. प्रति शेअर किंमत 133-140 रुपये निश्चित केली आहे, तर किमान लॉट साइज 107 शेअर्स आहे.
Quadrant Future Tek
ट्रेन कंट्रोल आणि सिग्नलिंग सिस्टीम बनवणाऱ्या Quadrant Future Tek चा IPO आज उघडला, ज्याचा आकार 290 कोटी रुपये आहे. यामध्ये 1 कोटी रुपयांचे नवीन इश्यू देखील जारी केले जातील, ज्याची किंमत 275-290 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे. यासाठी गुंतवणूकदार 9 जानेवारीपर्यंत बोली लावू शकतील.
Capital Infra Trust Invit IPO
Capital Infra Trust InvIT चा IPO देखील आज उघडला असून, 9 जानेवारी रोजी बंद होणार आहे. कंपनीच्या IPO चा आकार रु. 1,578 कोटी आहे. या IPO द्वारे कंपनीने 10.77 कोटी इक्विटी शेअर्स जारी करून 1,077 कोटी रुपये आणि OFS द्वारे 5.01 कोटी इक्विटी शेअर्स जारी करून 501 कोटी रुपये कमावण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामध्ये प्रति शेअर किंमत 99-100 रुपये निश्चित करण्यात आली आहे.
BR Goyal IPO
BR Goyal इन्फ्रास्ट्रक्चरचा IPO देखील आज उघडला असून, 9 जानेवारीला बंद होईल. बुक-बिल्ट इश्यूद्वारे 85.21 कोटी रुपये उभारण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. यामध्ये, 63.12 लाख ताजे इक्विटी शेअर्स जारी केले जातील, ज्याची किंमत 128 ते 135 रुपये प्रति शेअर ठेवण्यात आली आहे. त्याची BSE SME वर संभाव्य सूची 14 जानेवारीला होऊ शकते.
Delta Autocorp IPO
Delta AutoCorp चा IPO देखील आज उघडला आणि 9 जानेवारीला बंद होईल. त्याचा इश्यू आकार 54.60 कोटी रुपये आहे. किंमत 123 ते 130 रुपयांच्या दरम्यान ठेवण्यात आली आहे. 38.88 लाख शेअर्सचे ताजे इश्यू जारी केले जातील आणि 4.06 कोटी रुपयांचे 3.12 लाख शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत विकले जातील.
Avax Apparels & Ornaments IPO
Avax Apparels and Ornaments Limited IPO देखील आज सबस्क्रिप्शनसाठी उघडला आहे. 9 जानेवारी रोजी बंद होणार आहे. 2.74 लाख शेअर्सचा ताजा इश्यू आहे, ज्याद्वारे कंपनीला 1.92 कोटी रुपये कमवायचे आहेत. त्याची किंमत प्रति शेअर 70 रुपये आहे. कंपनी आयपीओमधून उभारलेल्या निधीचा वापर तिच्या उत्पादनाची श्रेणी वाढवण्यासाठी आणि रिटेल नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी करेल.
(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)