Lokmat Money >शेअर बाजार > स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?

स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?

Nestle India : कंपनीने एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, बोनस शेअर जारी करण्याच्या घोषणेचा अंतिम निर्णय कंपनीच्या सदस्यांकडून आगामी वार्षिक सर्वसाधारण बैठकीत घेतला जाईल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 14:57 IST2025-06-26T14:38:46+5:302025-06-26T14:57:16+5:30

Nestle India : कंपनीने एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, बोनस शेअर जारी करण्याच्या घोषणेचा अंतिम निर्णय कंपनीच्या सदस्यांकडून आगामी वार्षिक सर्वसाधारण बैठकीत घेतला जाईल.

Nestle India Bonus Shares Board Approves 1:1 Issue for First Time Since 1996 | स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?

स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?

Nestle India : जर तुम्ही नेस्ले इंडियामध्ये गुंतवणूक केली असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे! स्वित्झर्लंडची प्रसिद्ध अन्न कंपनी नेस्लेची उपकंपनी असलेल्या नेस्ले इंडियाने आज एक मोठी घोषणा केली आहे. कंपनीने त्यांच्या भागधारकांना १:१ च्या प्रमाणात बोनस शेअर्स देण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रत्येक शेअरवर एक मोफत शेअर
याचा अर्थ असा की, जर तुमच्याकडे नेस्ले इंडियाचा १ शेअर असेल, तर तुम्हाला त्यासोबत १ बोनस शेअर मोफत मिळेल. कंपनीने एक्सचेंजला दिलेल्या माहितीत सांगितले आहे की, १ रुपयांच्या दर्शनी मूल्याच्या (face value) प्रत्येक शेअरसाठी १ रुपयांच्या दर्शनी मूल्याचा बोनस शेअर दिला जाईल. कंपनीने १९ जून रोजीच याबाबतची शक्यता व्यक्त केली होती आणि आता त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

रेकॉर्ड डेट कधी?
नेस्ले इंडियाने अद्याप बोनस शेअर्ससाठी 'रेकॉर्ड डेट' जाहीर केलेली नाही. रेकॉर्ड डेट म्हणजे ती तारीख, ज्या दिवशी तुमच्याकडे शेअर असेल तरच तुम्ही बोनससाठी पात्र ठरता. कंपनीने म्हटले आहे की, बोनस शेअर्स जारी करण्यावर अंतिम निर्णय २४ जुलै रोजी होणाऱ्या कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) घेतला जाईल. रेकॉर्ड डेट लवकरच जाहीर केली जाईल.

१९९६ नंतर पहिल्यांदाच बोनस शेअर्स
हे विशेष आहे, कारण नेस्ले इंडियाने १९९६ नंतर पहिल्यांदाच बोनस शेअर्स जारी करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या घोषणेनंतर गुरुवारी कंपनीच्या शेअर्समध्ये किरकोळ वाढ दिसून आली. दुपारी १२:३४ वाजता शेअर २४०८.३५ रुपयांवर व्यवहार करत होता.

वाचा - 'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' मुंबई IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?

सध्या नेस्ले इंडियाचे बाजार भांडवल २,३२,४५८.२९ कोटी रुपये आहे. कंपनीच्या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक २७७७ रुपये, तर नीचांक २११५ रुपये आहे. तुम्ही नेस्ले इंडियाचे शेअरधारक आहात का? असल्यास, तुमच्यासाठी हा एक चांगला फायदा ठरू शकतो.
 

Web Title: Nestle India Bonus Shares Board Approves 1:1 Issue for First Time Since 1996

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.