Lokmat Money >शेअर बाजार > नवरत्न कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून मोठी ऑर्डर, 1060% वधारला आहे शेअर; गुंतवणूकदारांना केलंय मालामाल!

नवरत्न कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून मोठी ऑर्डर, 1060% वधारला आहे शेअर; गुंतवणूकदारांना केलंय मालामाल!

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या ऑर्डरमध्ये भारतीय सैन्याला एअर डिफेन्स फायर कंट्रोल रडार (Atulya) चा पुरवठा करेल... काय आहे याची खासियत जाणून घ्या....

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 18:35 IST2025-07-25T18:34:12+5:302025-07-25T18:35:15+5:30

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या ऑर्डरमध्ये भारतीय सैन्याला एअर डिफेन्स फायर कंट्रोल रडार (Atulya) चा पुरवठा करेल... काय आहे याची खासियत जाणून घ्या....

Navratna company gets big order from Ministry of Defense, shares increase by 1060 percent; Investors are enriched | नवरत्न कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून मोठी ऑर्डर, 1060% वधारला आहे शेअर; गुंतवणूकदारांना केलंय मालामाल!

नवरत्न कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून मोठी ऑर्डर, 1060% वधारला आहे शेअर; गुंतवणूकदारांना केलंय मालामाल!

नवरत्न कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला (BEL) संरक्षण मंत्रालयाकडून एक मोठा ऑर्डर मिळाला आहे. ही ऑर्डर तब्बल १६४० कोटी रुपयांची आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या ऑर्डरमध्ये भारतीय सैन्याला एअर डिफेन्स फायर कंट्रोल रडार (Atulya) चा पुरवठा करेल. हे स्वदेशी रडार संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने अर्थात DRDO ने केली आहे आणि भारत इलेक्ट्रॉनिक्सने त्याचे मॅन्युफॅक्चरिंग केले आह. हे रडार सर्व प्रकारच्या हवामानात दिवसा आणि रात्रीही हवाई धोक्यांपासून प्रभावी संरक्षण प्रदान करतात.

भारतीय सैन्य या एअर डिफेन्स फायर कंट्रोल रडारचा वापर प्रभावी सर्व्हिलन्स, अॅक्विझिशन, एअर टार्गेट्स ट्रॅक करणे आणि प्रभावी न्युट्रलायझेशनसाठी एअर डिफेन्स गनच्या कंट्रोलसाठी करेल. या रडारमध्ये इनबिल्ट ईसीएम कॅपेबिलिटीज आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, डिझाइनप्रमाणे सिस्टिम मॉड्यूलर आहे. यामुळे ते तैनात करणे, ऑपरेट करणे आणि देखभाल करणे अत्यंत सोपे आहे. 30 जून 2025 रोजी गेल्या डिसक्लोजरनंतर, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला 24 जुलैला 563 कोटी रुपयांची अॅडिशनल ऑर्डर मिळाली आहे. या नव्या ऑर्डरनुसार, कंपनीला क्रिटिकल डिफेन्स इक्विपमेंट आणि सिस्टिम्स सप्लाय करायचे आहे.

1060% ने वधारला शेअर - 
नवरत्न कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचा (BEL)  शेअर गेल्या पाच वर्षांत 1060 टक्क्यांनी वधारला आहे. हा शेअर 24 जुलै 2020 रोजी 34.07 रुपयांवर होता. तो 25 जुलै 2025 ला 395.20 रुपयांवर बंद झाला. गेल्या चार वर्षांत कंपनीच्या शेअर्समध्ये ५४९ टक्क्यांची वाढ झाली आहे. तीन वर्षांत नवरत्न कंपनीच्या शेअर्समध्ये ३४४ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या दोन वर्षांत भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या शेअर्समध्ये २१६ टक्क्यांनी वाढ झाली. महत्वाचे म्हणजे, भारत इलेक्ट्रॉनिक्सच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी ४३५.९५ रुपये एवढी आहे. याच वेळी, कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी २४०.१५ रुपये एवढी आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
 

 

Web Title: Navratna company gets big order from Ministry of Defense, shares increase by 1060 percent; Investors are enriched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.