NACDAC Infrastructure IPO :शेअर बाजार जोखमीचा आहे, पण कधी-कधी काही शेअर्स विक्रम प्रस्थापित करतातत. NACDAC इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने SME IPO मार्केटमध्ये एक नवा विक्रम केला आहे. कंपनीने फक्त ₹10 कोटी उभारण्यासाठी IPO लॉन्च केला होता, पण सबस्क्रिप्शनने सर्व रेकॉर्ड मोडले. या इश्यूला ₹14,000 कोटींच्या बोली मिळाल्या. भारतीय SME IPO च्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वात जास्त सबस्क्राईब केलेला IPO बनला आहे.
NACDAC इन्फ्रास्ट्रक्चर IPO तपशील
इश्यू आकार: ₹10 कोटी
किंमत बँड: ₹33-₹35 प्रति शेअर
उद्देशः खेळत्या भांडवलासाठी निधी उभारणे
ऑर्डर बुक: ₹ 88 कोटी
NACDAC इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या या IPO ने विशेषत: किरकोळ क्षेत्रातील गुंतवणूकदारांना आकर्षित केले. इश्यूला 2209 वेळा सबस्क्राइब करण्यात आले, जी आजपर्यंतची सर्वोच्च पातळी आहे.
NACDAC इन्फ्रास्ट्रक्चर IPO सबस्क्रिप्शन
किरकोळ गुंतवणूकदार (RETAIL): 2503 वेळा
संस्थात्मक खरेदीदार (QIB): 236 वेळा
गैर-संस्थात्मक गुंतवणूकदार (NII): 4084 वेळा
सर्वाधिक सबस्क्रिप्शन घेतलेल्या SME IPO ची यादी:
NACDAC इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड: ₹10 कोटी, 2209x सबस्क्रिप्शन
HOAC फूड्स इंडिया लिमिटेड: ₹5.5 कोटी, 2013x सबस्क्रिप्शन
हॅम्प्स बायो लिमिटेड: ₹6.2 कोटी, 1057x सबस्क्रिप्शन
NACDAC Infrastructure Limited च्या IPO मध्ये असा जबरदस्त सहभाग दर्शवितो की, गुंतवणूकदार एसएमई क्षेत्रात भरपूर पैसे गुंतवत आहेत. HOAC Foods आणि Hemps Bio सारखे IPO आधीच गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय आहेत.
(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)