Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > मार्च महिन्यात 'या' ५ शेअर्सने केले मालामाल; गुंतवणूकदारांना दिला २२६% परतावा....

मार्च महिन्यात 'या' ५ शेअर्सने केले मालामाल; गुंतवणूकदारांना दिला २२६% परतावा....

Multibagger Stocks: तुमच्याकडे आहेत का हे शेअर्स..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 15:29 IST2026-03-31T15:26:52+5:302026-03-31T15:29:33+5:30

Multibagger Stocks: तुमच्याकडे आहेत का हे शेअर्स..?

Multibagger Stocks: These 5 stocks made money in March; gave 226% returns to investors | मार्च महिन्यात 'या' ५ शेअर्सने केले मालामाल; गुंतवणूकदारांना दिला २२६% परतावा....

मार्च महिन्यात 'या' ५ शेअर्सने केले मालामाल; गुंतवणूकदारांना दिला २२६% परतावा....

Multibagger Stocks: मार्च महिना शेअर बाजारासाठी फारसा चांगला ठरला नाही. महिन्याच्या शेवटच्या दोन ट्रेडिंग सत्रांमध्ये बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. बाजारातील अस्थिरता आणि अनिश्चिततेच्या वातावरणातही काही कंपन्यांच्या शेअर्सनी मात्र गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. काही शेअर्समध्ये एका महिन्यात २२६ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

चला जाणून घेऊया अशा ५ कंपन्यांविषयी ज्यांनी गुंतवणूकदारांना मोठा नफा दिला.

Alfavision Overseas India

या कंपनीच्या शेअर्समध्ये एका महिन्यात २२६% वाढ झाली आहे. सोमवारी शेअर १.८७% वाढीसह १३.०८ रुपये या पातळीवर बंद झाला. बीएसईच्या डेटानुसार, कंपनीच्या शेअरमध्ये एका वर्षात सुमारे १.९५% वाढ झाली आहे.

Noble Polymers

या कंपनीच्या शेअरमध्ये एका महिन्यात १८७% वाढ झाली आहे. सोमवारी शेअर १.७२ रुपये या स्तरावर होता. कमी किमतीचा शेअर असल्यामुळे यात मोठी टक्केवारी वाढ दिसून आली आहे.

D & H India

मार्च महिना या कंपनीसाठीही उत्कृष्ट ठरला आहे. कंपनीच्या शेअर्सने एका महिन्यात १०८.५५% परतावा दिला आहे. म्हणजेच पोझिशनल गुंतवणूकदारांचे पैसे जवळपास दुप्पट झाले आहेत. सोमवारी शेअर २९३.८५ रुपये या स्तरावर ट्रेड होत होता.

Integrated Proteins

या कंपनीच्या शेअरमध्ये एका महिन्यात ९४% वाढ झाली आहे. सोमवारी शेअर ७२.७५ रुपये या स्तरावर होता. महत्त्वाचे म्हणजे, या कंपनीने ५ वर्षांत २१४५% परतावा दिला आहे, जो दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी मोठा फायदा मानला जातो.

Titan Biotech

या कंपनीच्या शेअर्समध्ये एका महिन्यात ८९% वाढ झाली आहे. सोमवारी शेअर ४५७.७० रुपये या स्तरावर पोहोचला होता.

(महत्त्वाची सूचना- शेअर बाजार हा जोखमीचा विषय आहे. कोणत्याही शेअरमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.) 

Web Title : मार्च के शीर्ष 5 शेयर: निवेशकों को 226% तक का रिटर्न मिला

Web Summary : मार्च में बाजार की अस्थिरता के बावजूद, कुछ शेयरों ने शानदार रिटर्न दिया। अल्फाविजन ओवरसीज इंडिया 226% की वृद्धि के साथ शीर्ष पर रहा। नोबल पॉलीमर्स, डी एंड एच इंडिया, इंटीग्रेटेड प्रोटीन और टाइटन बायोटेक ने भी निवेशकों के लिए पर्याप्त लाभ दिया। निवेश से पहले विशेषज्ञों से सलाह लें।

Web Title : March's Top 5 Stocks: Investors See Returns Up to 226%

Web Summary : Despite market volatility in March, certain stocks delivered impressive returns. Alfavision Overseas India led with a 226% surge. Noble Polymers, D & H India, Integrated Proteins, and Titan Biotech also yielded substantial profits for investors. Consult experts before investing.