Multibagger Stocks: गेल्या आठवड्यापासून शेअर बाजारातीलगुंतवणूकदारांच्या तोंडचं पाणी पळालं आहे. बाजारात दिग्गज म्हणवले जाणारे स्टॉक्सही जमिनीवर लोळत आहेत. काल सोमवारी सेन्सेक्स १००० हून अधिक अंकांनी घसरला. गेल्या आठवड्यातही बाजारात घसरण झाली. गेल्या ६ महिन्यांत सेन्सेक्स जवळपास ५ टक्क्यांनी घसरला आहे. त्याच वेळी, एका महिन्यात त्यात ६ टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत सेन्सेक्स तोट्यातच आहे. अशा परिस्थिती काही शेअर्सने याची उणीव भरुन काढली आहे.
शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, जे मल्टीबॅगर्स ठरले आहेत. घसरत्या बाजारातही त्यांनी गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे. यामध्ये ब्लू कोस्ट हॉटेल्स, आयरिस बिझनेस, आरवी डेनिम्स, बीजीआर एनर्जी इत्यादींचा समावेश आहे. गेल्या ६ महिन्यांत बाजारात घसरण होत असताना, या शेअर्सनी ३००% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. काहींना तर अपर सर्किट लागलं.
Blue Coast Hotels
या शेअरची किंमत २३.१६ रुपये आहे. आज मंगळवारी त्यात २ टक्के अपर सर्किट लागलं आहे. गेल्या एका महिन्यात या स्टॉकचा परतावा १०० टक्क्यांहून अधिक झाला आहे. म्हणजेच एका महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत. ६ महिन्यांबद्दल बोलायचे झाले तर या कालावधीत १५० टक्क्यांहून अधिक नफा झाला आहे.
Iris Business Services Ltd
या शेअरने मंगळवारीही ५ टक्क्यांच्या वरच्या सर्किटला धडक दिली. मात्र नंतर त्याची किंमत चढ-उतार होत राहिली. मंगळवारी सकाळी ११.३० वाजेपर्यंत त्याची किंमत ५७५ रुपये होती. गेल्या एका महिन्यात गुंतवणूकदारांना सुमारे २८ टक्के परतावा दिला आहे. तर ६ महिन्यांत त्याचा परतावा १२८ टक्क्यांहून अधिक आहे.
Aarvee Denims and Exports Ltd
या शेअरने बाजारात खळबळ उडवून दिली आहे. मंगळवारी तो २ टक्क्यांच्या लोअर सर्किटवर पोहोचला असला तरी त्यापूर्वी तो सतत वाढत होता. मंगळवारी लोअर सर्किटनंतर शेअर १३१.५२ रुपयांवर व्यवहार करत होता. एका महिन्यात ३७.५४% परतावा दिला आहे. ६ महिन्यांत त्याचा परतावा ३२३.८५ टक्के आहे.
BGR Energy Systems Ltd
हा स्टॉकही सातत्याने वाढत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यात २ टक्के अपर सर्किट आहे. मंगळवारीही २ टक्क्यांनी वरची सर्किट होती. यासह त्याची किंमत १२३.८० रुपयांवर पोहोचली आहे. या समभागाने एका महिन्यात ७६.६६ टक्के परतावा दिला आहे. गेल्या ६ महिन्यांत त्याचा परतावा सुमारे १६६ टक्के आहे.
डिस्क्लेमर : यामध्ये केवळ शेअर्सच्या कामगिरीची माहिती देण्यात आली होती. यामध्ये कोणत्याही प्रकारे गुंतवणुकीचा सल्ला देण्यात आलेला नाही. कुठल्याही प्रकराची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.