Lokmat Money >शेअर बाजार > ₹१२५ च्या शेअरमध्ये तुफान तेजी, आता ₹१९,००० पार जाऊ शकतो स्टॉक; एक्सपर्ट म्हणाले…

₹१२५ च्या शेअरमध्ये तुफान तेजी, आता ₹१९,००० पार जाऊ शकतो स्टॉक; एक्सपर्ट म्हणाले…

कंपनीचे शेअर्स तब्बल ५ टक्क्यांनी वधारले. कंपनीचे शेअर्स इंट्राडे उच्चांकी पातळी १२४८८.२५ रुपयांवर पोहोचले. शेअर्सच्या या वाढीमागे एक मोठं कारण आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 11:23 IST2025-03-08T11:22:14+5:302025-03-08T11:23:04+5:30

कंपनीचे शेअर्स तब्बल ५ टक्क्यांनी वधारले. कंपनीचे शेअर्स इंट्राडे उच्चांकी पातळी १२४८८.२५ रुपयांवर पोहोचले. शेअर्सच्या या वाढीमागे एक मोठं कारण आहे.

multibagger stock PTC Industries rise rs 125 shares now the stock may cross rs 19000 expert bullish | ₹१२५ च्या शेअरमध्ये तुफान तेजी, आता ₹१९,००० पार जाऊ शकतो स्टॉक; एक्सपर्ट म्हणाले…

₹१२५ च्या शेअरमध्ये तुफान तेजी, आता ₹१९,००० पार जाऊ शकतो स्टॉक; एक्सपर्ट म्हणाले…

Multibagger Stock: पीटीसी इंडस्ट्रीज लिमिटेडच्या (PTC Industries) शेअर्समध्ये शुक्रवारी तेजी दिसून आली. कंपनीचे शेअर्स तब्बल ५ टक्क्यांनी वधारले. कंपनीचे शेअर्स इंट्राडे उच्चांकी पातळी १२४८८.२५ रुपयांवर पोहोचले. शेअर्सच्या या वाढीमागे एक मोठं कारण आहे. वास्तविक, शनिवार, ८ मार्च २०२५ रोजी प्लांट विजिटपूर्वी शुक्रवारी ट्रेडिंग सेशनदरम्यान कंपनीचा शेअर अपर सर्किटवर पोहोचला. कंपनीनं मंगळवारी, ४ मार्च रोजी एक्सचेंज फाइलिंगच्या माध्यमातून ही माहिती दिली. ब्रोकरेज कंपन्या शेअरबाबत बुलिश आहेत. अँटिक स्टॉक ब्रोकिंगनं १९,६५३ रुपयांच्या टार्गेट प्राइससह यावर 'बाय' रेटिंग दिलंय.

कंपनीच्या शेअर्सची स्थिती

पीटीसी इंडस्ट्रीजचा शेअर शुक्रवारी ५ टक्क्यांनी वधारून १२,४८८.२५ रुपयांवर पोहोचला. कंपनीचं एकूण मार्केट कॅप १९,००० कोटी रुपयांच्या जवळपास पोहोचलंय. गुरुवारी हा शेअर ११,८९३.६० रुपयांवर बंद झाला. मात्र, जानेवारी २०२५ मधील ५२ आठवड्यांच्या उच्चांकी १७,९७८ रुपयांच्या तुलनेत हा शेअर ३० टक्क्यांहून अधिक घसरला आहे. विशेष म्हणजे मार्च २०२० मधील १२५ रुपयांच्या पातळीवरून आजपर्यंत पीटीसी इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये गेल्या पाच वर्षांत १० हजार टक्के किंवा १०० पटीनं वाढ झाली. ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवरून मोजलं तर या शेअरनं त्या पातळीवरून सुमारे १४,३०० टक्के किंवा १४३ पटीनं झेप घेतली आहे. गेल्या वर्षभरात या शेअरमध्ये सुमारे ५५ टक्के वाढ झाली आहे.

कंपनीचा व्यवसाय काय?

पीटीसी इंडस्ट्रीज ही एरोस्पेस, संरक्षण, ऑईल अँड गॅस, वीज आणि मरीन उद्योगांच्या गरजा पूर्ण करणारी अभियांत्रिकी क्षेत्रातील अग्रगण्य उत्पादकांपैकी एक आहे. पीटीसी इंडस्ट्रीजनं डिसेंबर २०२४ तिमाहीत (आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीत) एकत्रित निव्वळ नफ्यात ७६ टक्के वाढ नोंदविली आहे. कंपनीचं कामकाजातून मिळणारं उत्पन्न २०.६ टक्क्यांनी वाढून ६६.९२ कोटी रुपये झालं आणि इतर उत्पन्न आर्थिक वर्ष २०२४ च्या तिसऱ्या तिमाहीतील ३.६१ कोटी रुपयांवरून दुपटीनं वाढून १०.१९ कोटी रुपये झालंय.

(टीप- यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: multibagger stock PTC Industries rise rs 125 shares now the stock may cross rs 19000 expert bullish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.