Multibagger Stocks: शेअर बाजारातीलगुंतवणूक जोखमीची मानली जात असली, तरी योग्य वेळी योग्य शेअरमध्ये केलेली गुंतवणूक गुंतवणूकदारांचे नशीब पालटू शकते. 2025 मध्ये बाजारात मोठी चढ-उतार दिसून आली असतानाही, काही निवडक शेअर्सनी अल्पावधीतच प्रचंड परतावा देत ‘मल्टीबॅगर’ म्हणून ओळख निर्माण केली आहे. यावर्षी आतापर्यंत काही शेअर्सनी तब्बल 7,000 टक्क्यांहून अधिक परतावा देत गुंतवणूकदारांना चकित केले आहे.
2025 मध्ये बाजाराची स्थिती
2025 या वर्षात विविध कारणांमुळे शेअर बाजारात अस्थिरता पाहायला मिळाली. तरीही प्रमुख निर्देशांक तुलनेने स्थिर राहिले आहेत. निफ्टी 50 सुमारे 10% वाढला, तर सेन्सेक्समध्ये वर्षागणिक सुमारे 9% वाढ झाली. बीएसई मिडकॅप निर्देशांकात फारसा बदल नसला, तरी काही निवडक शेअर्सची कामगिरी अत्यंत उल्लेखनीय ठरली आहे.
2025 मधील टॉप मल्टीबॅगर शेअर्स
1) RRP सेमीकंडक्टर
2025 मधील सर्वाधिक परतावा देणाऱ्या शेअर्समध्ये RRP सेमीकंडक्टरने अव्वल स्थान पटकावले आहे.
परतावा: 7,396.32%
भाव: ₹149.50 वरून ₹11,207 पर्यंत झेप
मार्केट कॅप: ₹15,380 कोटी
2) स्वदेशी इंडस्ट्रीज
स्वदेशी इंडस्ट्रीजचा शेअरही यंदा मल्टीबॅगर ठरला आहे.
परतावा: 4,913.70%
भाव: ₹2.92 वरून ₹146.40
3) RRP डिफेन्स
पूर्वी युरो एशिया एक्सपोर्ट्स लिमिटेड म्हणून ओळखली जाणारी RRP डिफेन्स कंपनीही टॉप-10 मल्टीबॅगर यादीत आहे.
परतावा: 4,738.76%
भाव: ₹19.35 वरून ₹936.30
मार्केट कॅप: ₹1,280 कोटी
4) मिडवेस्ट गोल्ड
मिडवेस्ट गोल्डच्या शेअरनेही 2025 मध्ये दमदार कामगिरी केली आहे.
परतावा: 3,926.68%
भाव: ₹101.20 वरून ₹4,075
5) स्वान डिफेन्स अँड हेवी इंडस्ट्रीज
या यादीतील आणखी एक महत्त्वाचा शेअर म्हणजे स्वान डिफेन्स.
परतावा: 3,072%
भाव: ₹37.80 वरून ₹1,199.30
मार्केट कॅप: ₹6,320 कोटी
(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)
