Multibagger Stock: भारतीय शेअर बाजारात घसरण असली तरी एलिटेकॉन इंटरनॅशनलच्या शेअरला ५ टक्क्यांचं अपर सर्किट लागलं. कंपनीने परदेशी कंपनीच्या अधिग्रहणाची घोषणा केल्यानंतर ही वाढ झाली. या कंपनीच्या शेअरने गेल्या वर्षभरात ८,३८५ टक्के परतावा देत गुंतवणूकदारांना मोठा नफा दिला आहे. दुसरीकडे देशांतर्गत शेअर बाजार घसरणीच्या मार्गावर होता.
संचालक मंडळाच्या बैठकीत काय झालं?
९ जुलै २०२५ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत एलिटेकॉनन दुबईच्या प्राइम प्लेस स्पाइस ट्रेडिंग एल.एल.सी.च्या खरेदीस मान्यता दिली. कंपनी मसाले, शेंगदाणे, कॉफी, चहा आणि चॉकलेट सारख्या एफएमसीजी उत्पादनांचा व्यवहार करते आणि २०२४ मध्ये १६०.१५ मिलियन AED ची उलाढाल होती.
Glen Industries IPO च्या GMP मध्ये तुफान तेजी; आतापर्यंत ४३ पट झाला सबक्राइब, पाहा डिटेल्स
एलिटेकॉन भारतातील एफएमसीजी क्षेत्रात आधीच सक्रिय आहे आणि आता जागतिक बाजारपेठेत पाय रोवू पाहत आहे. दुबई हे एक मोठे बिझनेस सेंटर आहे, त्यामुळे या करारामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कंपनी मजबूत होईल.
शेअरच्या भावात मोठी वाढ
शेअरचा भाव आदल्या दिवसाच्या तुलनेत ५ टक्क्यांनी वाढून आज ९३.३४ रुपयांवर पोहोचला. शेअरचा हा ५२ आठवड्यांचा उच्चांक आहे. गेल्या ५ दिवसांपासून त्यात अपर सर्किट लागलंय. या कालावधीत त्यात २१ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. एका महिन्यात ५३% आणि ६ महिन्यांत ६८५% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. वर्षभरापूर्वी याची किंमत १.१० रुपये होती.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)