Lokmat Money >शेअर बाजार > अवघ्या 2,3 रुपयांचे मल्टिबॅगर स्टॉक्स; एका वर्षात गुंतवणूकदारांना केले मालामाल...

अवघ्या 2,3 रुपयांचे मल्टिबॅगर स्टॉक्स; एका वर्षात गुंतवणूकदारांना केले मालामाल...

Top Multibagger Penny Stocks: एका शेअरने तर वर्षभरात 565.43 टक्के परतावा दिला. 1 लाखाचे 5 लाख केले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 18:42 IST2025-01-01T18:40:54+5:302025-01-01T18:42:51+5:30

Top Multibagger Penny Stocks: एका शेअरने तर वर्षभरात 565.43 टक्के परतावा दिला. 1 लाखाचे 5 लाख केले.

Multibagger Penny Stocks: Multibagger stocks worth just Rs 2.3; Made investors rich in a year | अवघ्या 2,3 रुपयांचे मल्टिबॅगर स्टॉक्स; एका वर्षात गुंतवणूकदारांना केले मालामाल...

अवघ्या 2,3 रुपयांचे मल्टिबॅगर स्टॉक्स; एका वर्षात गुंतवणूकदारांना केले मालामाल...

Top Multibagger Penny Stocks : तुम्हाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची आहे, पण भांडवल नाही. चिंता करू नका, कारण शेअर मार्केटमध्ये 10 पैशांपासून ते 1 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे शेअर्स उपलब्ध आहेत. बहुतांश गुंतवणूकदार मोठ्या किंवा मध्यम किमतीच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवतात. कारण लोक त्या शेअर्सना सुरक्षित मानतात. पण, काही कमी किमतीचे शेअर्सदेखील आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला आहे. आज आम्ही तुम्हाला अशा 4 शेअर्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी गेल्या एका वर्षात 100 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

Bridge Securities Ltd

Bridge Securities Ltdच्या शेअर्सनी एका वर्षात त्यांच्या गुंतवणूकदारांना 565.43 टक्के परतावा दिला आहे. म्हणजेच एका वर्षात 1 लाख रुपयांच्या गुंतवणूकीला 5 लाखांपेक्षा बनवले आहे. आज बाजार बंद होईपर्यंत Bridge Securities Ltd च्या एका शेअरची किंमत 10.78 रुपये होती. कंपनीचे ​​मार्केट कॅप 41.9 कोटी रुपये आहे. 

Taparia Tools Ltd

Taparia Tools Ltd च्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना एका वर्षात 200 टक्के परतावा दिला आहे. आज एका शेअरची किंमत 9.64 रुपये आहे. या स्टॉकची खास गोष्ट म्हणजे, अनेक सत्रांपासून यात सतत अप्पर सर्किट लागत आहे. Taparia Tools Ltd चे मार्केट कॅप 14.6 कोटी रुपये आहे. 

Monotype India Ltd

Monotype India Ltd च्या एका शेअरची आजची, म्हणजेच 1 जानेवारी 2025 रोजी बाजार बंद होईपर्यंतची किंमत 1.80 रुपये आहे. या शेअरने गेल्या एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 140 टक्के परतावा दिला आहे. कंपनीचे सध्याचे मार्केट कॅप 127 कोटी रुपये आहे. 

Franklin Industries Ltd

Franklin Industries Ltdच्या शेअर्सनी एका वर्षात त्यांच्या गुंतवणूकदारांना 106.11 टक्के परतावा दिला आहे. आज या शेअरमध्ये 4.65 टक्क्यांची वाढ दिसून आली. हे शेअर्स सध्या 2.70 रुपयांवर व्यवहार करत आहेत. कंपनीचे मार्केट कॅप 78.1 कोटी रुपये आहे. 

(टीप-शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: Multibagger Penny Stocks: Multibagger stocks worth just Rs 2.3; Made investors rich in a year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.