Multibagger Penny Stock:शेअर बाजारातीलगुंतवणूक जोखमीच्या अधीन असते, पण कधी-कधी असा शेअर हाती लागतो, तो अल्प किंवा दीर्घ कालावधीत मालामाल करतो. आपल्या गुंतवणुकीपेक्षा कैकपट जास्त परतावा या शेअरमधून मिळतो. आज आम्ही तुम्हाला अशाच एका शेअरबद्दल सांगणार आहोत, ज्याने दीर्घकाळात गुंतवणूकदारांना करोडपती केले.
हा सेअर KDDL लिमिटेडचा आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सत्रात हा शेअर रु. 2,883 वर व्यवहार करत होता. विशेष म्हणजे, त्याकाळी अवघ्या 16.50 रुपयांवर असलेल्या या शेअरने गेल्या 16 वर्षात सूमारे 17,373 टक्क्यांचा परतावा दिला आहे. या शेअरचा इतिहास पाहिला तर त्याने कमी कालावधीत चांगला परतावा दिला आहे.
जर एखाद्या गुंतवणूकदाराने 16 वर्षांपूर्वी KDDL लिमिटेडच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील आणि गुंतवणूक आजपर्यंत कायम ठेवली असेल, तर आजच्या शेअरच्या किमतीनुसार त्याला 1.83 कोटी रुपये मिळतील. तर, गेल्या पाच वर्षांत या शेअरमध्ये 1,016.10 टक्क्यांहून अधिक प्रभावी वाढ झाली आहे.
(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)