Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा

फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा

Crorepati Stock : एका स्मॉल-कॅप स्टॉकने "छोटे पॅकेज, मोठा धमाका" ही म्हण सिद्ध केली आहे. फक्त २९ पैशांच्या किमतीच्या स्वदेशी इंडस्ट्रीजच्या शेअर्सनी पाच वर्षांत गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 17:28 IST2025-11-05T17:28:50+5:302025-11-05T17:28:50+5:30

Crorepati Stock : एका स्मॉल-कॅप स्टॉकने "छोटे पॅकेज, मोठा धमाका" ही म्हण सिद्ध केली आहे. फक्त २९ पैशांच्या किमतीच्या स्वदेशी इंडस्ट्रीजच्या शेअर्सनी पाच वर्षांत गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे.

Multibagger Alert Swadeshi Industries Share Jumps 35000% in 5 Years; ₹1 Lakh Investment Turns Into Crores. | फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा

फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा

Share Market : शेअर बाजारात असे अनेक स्टॉक्स आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना अल्पावधीत श्रीमंत बनवले आहे. यात केवळ मोठ्या कंपन्यांचेच नाही, तर अनेक 'पेनी स्टॉक्स' देखील समाविष्ट आहेत. महाराष्ट्रातील स्वदेशी इंडस्ट्रीज अँड लीजिंग लिमिटेड या कंपनीच्या शेअरने असाच एक जबरदस्त पराक्रम केला आहे. अवघ्या ५ वर्षांपूर्वी फक्त २९ पैसे भावाने मिळत असलेला हा शेअर, आता गुंतवणूकदारांसाठी अक्षरशः 'पैसा छापण्याची मशीन' ठरला आहे. या स्टॉकमध्ये फक्त १ लाख रुपये गुंतवणारे आता करोडपती झाले आहेत!

५ वर्षांत दिला ३५,०००% रिटर्न!
स्वदेशी इंडस्ट्रीज अँड लीजिंग लिमिटेड ही एक स्मॉलकॅप कंपनी आहे. ही कंपनी टेक्सटाइल, कॉपर, फूड प्रॉडक्ट्स आणि पीव्हीसी बाटल्यांच्या व्यवसायाशी संबंधित आहे, तसेच लीजिंग सेवाही पुरवते. फक्त पाच वर्षांमध्ये या 'स्वदेशी शेअरने' आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल ३४,३५८.६२% चा मल्टीबॅगर परतावा दिला आहे. या कालावधीत शेअरची किंमत २९ पैशांवरून वाढून कालच्या ट्रेडिंग सत्रात अप्पर सर्किटसह थेट ९९.९३ रुपयांवर पोहोचली आहे, जो या शेअरचा आजपर्यंतचा उच्चांक आहे.

१ लाख गुंतवलेले झाले कोट्यधीश
जर एखाद्या गुंतवणूकदाराने ६ नोव्हेंबर २०२० रोजी २९ पैसे भावाने १ लाख रुपयांचे स्वदेशी इंडस्ट्रीजचे शेअर्स खरेदी केले असते आणि ते आतापर्यंत होल्ड केले असते, तर आज त्यांची रक्कम वाढून तब्बल ३४,४५८,००० (तीन कोटी ४४ लाख ५८ हजार रुपये) झाली असती! म्हणजेच, फक्त एक लाख रुपये गुंतवणाऱ्या व्यक्तीचा पोर्टफोलिओ आता कोट्यवधी रुपयांचा झाला आहे.

सातत्याने अप्पर सर्किट
गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवणाऱ्या या शेअरच्या अलीकडील कामगिरीवर नजर टाकल्यास, यात सलग ५ दिवसांपासून अप्पर सर्किट लागत आहे. केवळ ५ वर्षांतच नाही, तर या मल्टीबॅगर स्टॉकरने गेल्या १ वर्षातही ३५००% चा जबरदस्त परतावा दिला आहे, तर सहा महिन्यांत यात पैसे लावणाऱ्या गुंतवणूकदारांची रक्कम ९ पटीहून अधिक वाढली आहे. बाजार भांडवल फक्त १०८ कोटी रुपये असतानाही, या 'छोट्याशा' शेअरने गुंतवणूकदारांचे नशीब पालटले आहे. मात्र, पेनी स्टॉक्समध्ये नेहमीच मोठा धोका असतो, त्यामुळे कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

वाचा - चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title : 29 पैसे का शेयर बढ़कर ₹100 हुआ, लाखों बन गए करोड़!

Web Summary : स्वदेशी इंडस्ट्रीज का शेयर पांच वर्षों में 29 पैसे से बढ़कर ₹99.93 हो गया, जिससे 35,000% रिटर्न मिला। ₹1 लाख का निवेश अब ₹3.44 करोड़ का होगा। टेक्सटाइल और लीजिंग से जुड़ी इस स्मॉलकैप कंपनी ने निवेशकों को मालामाल कर दिया है।

Web Title : Penny stock jumps from 29 paise to ₹100, turns lakhs into crores!

Web Summary : Swadeshi Industries' share price surged from 29 paise to ₹99.93 in five years, delivering 35,000% returns. A ₹1 lakh investment would now be worth ₹3.44 crore. The smallcap stock, involved in textiles and leasing, has seen consecutive upper circuits, transforming investor fortunes.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.