Lokmat Money >शेअर बाजार > अंबानी-अदानींना मोठा झटका; चिनी व्हायरसने खाल्ले 52000 कोटी रुपये; नेमकं काय घडलं?

अंबानी-अदानींना मोठा झटका; चिनी व्हायरसने खाल्ले 52000 कोटी रुपये; नेमकं काय घडलं?

चीनी व्हायरसमुळे शेअर बाजार हादरला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 14:54 IST2025-01-07T14:54:36+5:302025-01-07T14:54:59+5:30

चीनी व्हायरसमुळे शेअर बाजार हादरला आहे.

Mukesh Ambani-Gautam Adani: Big blow to Ambani-Adani; Rs 52000 crore lost due to Chinese virus | अंबानी-अदानींना मोठा झटका; चिनी व्हायरसने खाल्ले 52000 कोटी रुपये; नेमकं काय घडलं?

अंबानी-अदानींना मोठा झटका; चिनी व्हायरसने खाल्ले 52000 कोटी रुपये; नेमकं काय घडलं?

Mukesh Ambani-Gautam Adani : चीनमध्ये आढळलेल्या HMPV विषाणूचा फैलाव हळुहळू इतर देशांमध्येही होत आहे. भारतात काही बालकांना या विषाणूची लागण झाली आहे. या विषाणूला घाबरण्याची गरज नसल्याचे तज्ञांचे म्हणने आहे, तरीदेखील सामान्यांमध्ये चितेंचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, या विषाणूचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला. या चिनी विषाणूने जगातील अव्वल 20 श्रीमंतांमध्ये गणल्या जाणाऱ्या मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांचे तब्बल 52 हजार कोटी रुपये खाल्ले आहेत.

ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकातून ही बाब समोर आली आहे. मंगळवारी शेअर बाजारातील घसरणीमुळे, या दोन्ही अब्जाधीशांच्या संपत्तीत मोठी घट झाली. या घसरणीचे कारण HMPV विषाणू आहे. गौतम अदानी आणि मुकेश अंबानी, यांच्या संपत्तीत एकत्रितपणे 52 हजार कोटी रुपयांची घट झाली आहे. 

मुकेश अंबानींच्या संपत्तीत घट
ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांनुसार, आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती असलेल्या मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत 2.59 अब्ज डॉलर्स, म्हणजेच 22 हजार कोटी रुपयांहून अधिकची घट झाली आहे. त्यामुळेच त्यांची एकूण संपत्ती 90.5 अब्ज डॉलर्सवर आली आहे. विशेष बाब म्हणजे, 2025 च्या पहिल्या सहा दिवसांतच अंबानींच्या संपत्तीत 119 मिलिन डॉलर्सची घट झाली आहे. सध्या मुकेश अंबानी जगातील श्रीमंतांच्या यादीत 17 व्या क्रमांकावर आहेत. 

गौतम अदानी यांची संपत्तीही कमी झाली
आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे आणि जगातील 19 व्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांच्या संपत्तीत सर्वात मोठी घट झाली आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सच्या आकडेवारीनुसार, गौतम अदानी यांच्या संपत्तीत 3.53 अब्ज डॉलर्स, म्हणजेच 30 हजार कोटी रुपयांहून अधिकची घट झाली आहे. यानंतर त्यांची एकूण संपत्ती 74.5 अब्ज डॉलरवर आली आहे. विशेष म्हणझे, 2025 च्या पहिल्या काही दिवसांतच त्यांच्या संपत्तीत $4.21 अब्ज डॉलर्सची घट झाली आहे. 

Web Title: Mukesh Ambani-Gautam Adani: Big blow to Ambani-Adani; Rs 52000 crore lost due to Chinese virus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.