Mobikwik IPO GMP Price Today: फिनटेक कंपनी मोबिक्विकच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांमध्ये जबरदस्त क्रेझ आहे. बुधवार, ११ डिसेंबर रोजी हा आयपीओ गुंतवणूकासाठी उघडला. या आयपीओमध्ये अर्ज करण्यासाठी आज अखेरचा दिवस आहे. आयपीओ आज बंद होत आहे. पहिल्या दोन दिवसांत आयपीओला २१.६७ पट सब्सक्रिप्शन मिळालंय. आज म्हणजेच आयपीओच्या शेवटच्या दिवशी कंपनीच्या आयपीओला आणखी जास्त प्रतिसाद मिळू शकतो, असं म्हटलं जातंय.
किरकोळ गुंतवणूकदारांच्या उड्या
किरकोळ गुंतवणूकदार मोबिक्विकच्या आयपीओमध्ये सर्वाधिक रस दाखवत आहेत. पहिल्या दोन दिवसांत किरकोळ गुंतवणूकदारांनी ६८.८८ पट आयपीओ सब्सक्राइब केला. किरकोळ गुंतवणूकदारांपाठोपाठ एनआयआय श्रेणीतील गुंतवणूकदारांनी हा आयपीओसाठी ३१.७५ पट सब्सक्राइब केलाय. मात्र, या आयपीओसाठी सुरुवातीच्या दोन दिवसांत क्यूआयबी श्रेणीतील गुंतवणूकदारांनी फारसा रस दाखवला नाही आणि केवळ ०.८९ पट सब्सक्राइब झालाय.
२,०५,०१,७९२ शेअर्स जारी होणार
मोबिक्विक आपल्या आयपीओमधून ५७२.०० कोटी रुपये उभारण्याचा विचार करत आहे. या आयपीओअंतर्गत एकूण २,०५,०१,७९२ नवे शेअर्स जारी केले जातील. या आयपीओमध्ये ओएफएसचा समावेश नाही. हा मेनबोर्ड आयपीओ आहे, या अंतर्गत शेअर्स बीएसई आणि एनएसई दोन्हीवर लिस्ट होतील. आज आयपीओ बंद झाल्यानंतर सोमवार, १६ ऑगस्ट रोजी शेअर्सचं वाटप केलं जाईल आणि त्यानंतर १७ डिसेंबर रोजी शेअर्स डिमॅट खात्यात ट्रान्सफर केले जातील. कंपनीची शेअर बाजारात लिस्टिंग १८ डिसेंबर रोजी होण्याची शक्यता आहे.
जीएमपीत तुफान तेजी
फिनटेक कंपनीच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. अशा तऱ्हेने ग्रे मार्केटमध्येही कंपनीच्या शेअर्सची मोठी क्रेझ आहे. शुक्रवारी, १३ डिसेंबर रोजी ग्रे मार्केटमध्ये मोबिक्विकचा शेअर १५६ रुपये (५५.९१ टक्के) प्रीमियमवर व्यवहार करत होता. मात्र, लिस्टिंग होईपर्यंत त्याची जीएमपी किंमत आणखी वाढू शकते.
(टीप : यामध्ये केवळ आयपीओविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)