Midwest IPO: आयपीओ बाजारात आज आणखी एका शानदार लिस्टिंगचा अनुभव मिळाला. 'ब्लॅक गॅलेक्सी' ग्रॅनाइट बनवणारी कंपनी मिडवेस्ट लिमिटेडची (Midwest Limited) आज शेअर बाजारात जोरदार एन्ट्री झाली. ज्या गुंतवणूकदारांनी या आयपीओमध्ये पैसे लावले होते, त्यांना पहिल्याच दिवशी जबरदस्त नफा मिळाला आहे. हा शेअर आपल्या इश्यू प्राईजपेक्षा ९% हून अधिक प्रीमियमवर उघडला.
बीएसईवर ९.३९% प्रीमियमवर लिस्टिंग
मिडवेस्ट लिमिटेडचे शेअर आज बीएसई (BSE) आणि एनएसई (NSE) दोन्ही एक्सचेंजेसवर लिस्ट झाले आहेत. बीएसईवर ते ९.३९% च्या मजबूत प्रीमियमसह ₹११६५ रुपयांवर लिस्ट झाले. कंपनीनं आपल्या आयपीओची इश्यू किंमत ₹१,०६५ प्रति शेअर निश्चित केली होती. या हिशोबाने, गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर ₹१०० चा थेट लिस्टिंग गेन मिळाला.
अपेक्षेनुसार झाली सुरुवात
मिडवेस्ट आयपीओची ही लिस्टिंग बाजारातील तज्ज्ञ आणि ग्रे मार्केटच्या अपेक्षांनुसारच झाली आहे. लिस्टिंगपूर्वी, या कंपनीचा ग्रे मार्केट प्रीमियम ₹१११ च्या आसपास चालू होता, जो ₹१,१७६ (₹१०६५ + ₹१११) च्या आसपास लिस्टिंगचे संकेत देत होता. ₹१,१६५ ची वास्तविक लिस्टिंग या अंदाजाच्या खूप जवळ आहे. बहुतेक तज्ज्ञांनी देखील ९-१०% च्या प्रीमियमवर लिस्ट होण्याचा अंदाज व्यक्त केला होता, जो अगदी अचूक ठरला.
दमदार लिस्टिंगची अपेक्षा का होती?
या आयपीओच्या शानदार लिस्टिंगची अपेक्षा आधीपासूनच होती. याचं मुख्य कारण म्हणजे या आयपीओला गुंतवणूकदारांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. १५ ते १७ ऑक्टोबरपर्यंत खुला असलेल्या या इश्यूला ९२ पट सब्सक्रिप्शन मिळालं होतं. कंपनीनं या आयपीओद्वारे ₹४५१ कोटी रुपये जमा केले आहेत, ज्यापैकी ₹१३५ कोटी रुपये एकट्या अँकर गुंतवणूकदारांकडून आले होते. 'ब्लॅक गॅलेक्सी' ग्रॅनाइटच्या व्यवसायात कंपनीची मजबूत पकड आणि शानदार सब्सक्रिप्शन आकडेवारीनेच या दमदार लिस्टिंगचा पाया रचला होता.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
