Stock Market : गेल्या चार सत्रांपासून सुरू असलेल्या घसरणीच्या मालिकेला शुक्रवारी पूर्णविराम मिळाला. जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत, रुपयातील स्थिरता आणि 'बँक ऑफ जपान'चा धोरणात्मक निर्णय अपेक्षेनुसार राहिल्याने गुंतवणूकदारांनी बाजारात जोरदार खरेदी केली. यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४४८ अंकांनी उसळला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्यानिफ्टीने १५१ अंकांची आघाडी घेत आठवड्याचा शेवट गोड केला.
बाजाराची आजची चाल
शुक्रवारी बाजाराने सुरुवातीपासूनच सकारात्मक कल दाखवला. सेन्सेक्स ८४,७५६ च्या पातळीवर उघडल्यानंतर, दिवसअखेर ०.५३ टक्क्यांच्या वाढीसह ८४,९२९ वर स्थिरावला. तर निफ्टी ५० २५,९११ वर ओपनिंग दिल्यानंतर, दिवसअखेर ०.५८ टक्क्यांच्या वाढीसह २५,९६६ वर बंद झाला. विशेष म्हणजे, लार्जकॅप शेअर्सच्या तुलनेत मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांनी गुंतवणूकदारांना अधिक मालामाल केले. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप या दोन्ही निर्देशांकात प्रत्येकी १.२५ टक्क्यांची शानदार तेजी पाहायला मिळाली.
नफा देणारे शेअर्स
निफ्टी ५० मध्ये श्रीराम फायनान्सने ३.७१ टक्क्यांच्या वाढीसह बाजी मारली. त्याखालोखाल मॅक्स हेल्थकेअर (२.६१%), भारत इलेक्ट्रॉनिक्स (२.४६%), पॉवर ग्रिड (२.१४%) आणि टाटा मोटर्स (१.५५%) या शेअर्समध्ये मोठी खरेदी दिसून आली.
तोट्यातील शेअर्स
दुसरीकडे, आयटी क्षेत्रातील दिग्गज एचसीएल टेकला १.१५ टक्क्यांच्या घसरणीचा फटका बसला. हिंदाल्को (०.५५%), जेएसडब्ल्यू स्टील (०.२५%), कोटक बँक (०.२४%) आणि आयसीआईसीआय बँक (०.२०%) हे शेअर्सही तोट्यात राहिले.
क्षेत्रीय हालचाली
- निफ्टी डिफेन्स : २.०४% तेजी
- निफ्टी रिअल्टी : १.६७% तेजी
- निफ्टी ऑटो : १.२३% तेजी
- निफ्टी फार्मा : ०.८६% तेजी
वाचा - विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
बँकिंग आणि आयटी निर्देशांकातही किरकोळ वाढ पाहायला मिळाली, मात्र मेटल आणि मीडिया क्षेत्रातील तेजी अत्यंत मर्यादित होती.
