Lokmat Money >शेअर बाजार > HMPV विषाणूच्या भीतीतून सावरला बाजार, मोठी तेजी; ONGC, ITC, HCL, Titan चे शेअर्स वधारले

HMPV विषाणूच्या भीतीतून सावरला बाजार, मोठी तेजी; ONGC, ITC, HCL, Titan चे शेअर्स वधारले

Share Market Open : सोमवारच्या जोरदार विक्रीनंतर मंगळवारी (७ जानेवारी) देशांतर्गत शेअर बाजाराची जोरदार सुरुवात झाली. सेन्सेक्स २५० अंकांनी वधारून ७८,२११ च्या आसपास व्यवहार करत होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 09:50 IST2025-01-07T09:50:34+5:302025-01-07T09:50:34+5:30

Share Market Open : सोमवारच्या जोरदार विक्रीनंतर मंगळवारी (७ जानेवारी) देशांतर्गत शेअर बाजाराची जोरदार सुरुवात झाली. सेन्सेक्स २५० अंकांनी वधारून ७८,२११ च्या आसपास व्यवहार करत होता.

Market recovers from china HMPV virus scare big rally ONGC ITC HCL Titan shares rise | HMPV विषाणूच्या भीतीतून सावरला बाजार, मोठी तेजी; ONGC, ITC, HCL, Titan चे शेअर्स वधारले

HMPV विषाणूच्या भीतीतून सावरला बाजार, मोठी तेजी; ONGC, ITC, HCL, Titan चे शेअर्स वधारले

Share Market Open : सोमवारच्या जोरदार विक्रीनंतर मंगळवारी (७ जानेवारी) देशांतर्गत शेअर बाजाराची जोरदार सुरुवात झाली. सेन्सेक्स २५० अंकांनी वधारून ७८,२११ च्या आसपास व्यवहार करत होता. निफ्टी १०० अंकांनी वधारून २३,७२० वर व्यवहार करत होता. बँक निफ्टी १६४ अंकांनी वधारून ५०,०८६ च्या पातळीवर होता. निफ्टी मिडकॅप १०० मध्येही जवळपास ३०० अंकांची वाढ झाली. कन्झ्युमर ड्युरेबल्स आणि ऑईल अँड गॅस शेअर्समध्ये तेजी दिसून आली. याशिवाय मेटल, आयटी, एफएमसीजी, पीएसयू बँक या निर्देशांकांमध्ये तेजी होती. जवळपास सर्वच निर्देशांक ग्रीन झोनमध्ये व्यवहार करत होते.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
https://www.whatsapp.com/channel/0029VaBACbfInlqHyOB7FE09

निफ्टीवर ओएनजीसी, आयटीसी, बीपीसीएल, टायटन, इंडसइंड बँक, टाटा स्टील या शेअर्समध्ये तेजी होती. तर काल सर्वाधिक तेजी असलेल्या अपोलो हॉस्पिटलच्या शेअरमध्ये मात्र आज घसरण दिसून आली. मागील बंदच्या तुलनेत सेन्सेक्स ५५ अंकांनी वधारून ७८,०१९ वर उघडला. निफ्टी ६३ अंकांनी वधारून २३,६७९ वर आणि बँक निफ्टी १३९ अंकांनी वधारून ५०,०६१ वर उघडला.

जागतिक बाजारातून आज थोडे चांगले संकेत मिळत आहेत. सोमवारी जोरदार विक्रीनंतर आज बाजारात काही प्रमाणात स्थैर्य येण्याची अपेक्षा आहे. कालच्या प्रचंड घसरणीसमोर एफआयआयने ४५०० कोटी रुपयांपेक्षा कमी कॅश, इंडेक्स आणि शेअर फ्युचर्सची विक्री केली होती, तर देशांतर्गत फंडांनी ५७५० कोटींची मोठी खरेदी केली होती. मात्र, प्री-ओपनिंगमध्ये संमिश्र संकेत होते. निफ्टी ८७ अंकांच्या वाढीसह २३,८०८ वर व्यवहार करत होता.
काल देशात एचएमपीव्ही विषाणूचे रुग्ण आढळल्यानंतर बाजारात भीतीनं विक्री दिसून आली. देशात आतापर्यंत ६ रुग्ण आढळले आहेत. आरोग्यमंत्री जेपी नड्डा यांनी एचएमपीव्ही हा नवीन विषाणू नसून सरकार परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असल्याचं म्हटलं

ग्लोबल मार्केट्सचे अपडेट्स

अमेरिकेच्या बाजारपेठे संमिश्र कल पाहायला मिळाला. नॅसडॅकनं सलग दुसऱ्या दिवशी २५० अंकांची झेप घेत मजबूत कामगिरी केली, तर डाऊ ४०० अंकांनी घसरून दिवसाच्या उच्चांकी पातळीपेक्षा २५ अंकांनी खाली बंद झाला. सकाळी डाऊ फ्युचर्स फ्लॅट होते. निक्केईने जवळपास ७०० अंकांची उसळी घेतली होती. सलग ५ दिवसांच्या तेजीनंतर कच्च्या तेलाची किंमत कमी होऊन ७६ डॉलरच्या वर राहिली. सोनं २६५० डॉलरच्या खाली तर चांदी एक टक्क्याने वधारली.

Web Title: Market recovers from china HMPV virus scare big rally ONGC ITC HCL Titan shares rise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.