Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > बाजारात 'सुपर वेन्सडे'! सेन्सेक्स ८२,६०० पार; गुंतवणूकदारांनी एकाच दिवसात कमावले ४.२९ लाख कोटी

बाजारात 'सुपर वेन्सडे'! सेन्सेक्स ८२,६०० पार; गुंतवणूकदारांनी एकाच दिवसात कमावले ४.२९ लाख कोटी

Share Market Today : अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदर कपातीचे संकेत दिल्याने गुंतवणूकदारांना उत्साह मिळाला आणि त्यांनी जोरदार खरेदी केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 17:02 IST2025-10-15T17:02:40+5:302025-10-15T17:02:40+5:30

Share Market Today : अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदर कपातीचे संकेत दिल्याने गुंतवणूकदारांना उत्साह मिळाला आणि त्यांनी जोरदार खरेदी केली.

Market Rally 2025 Nifty Jumps 0.71% to 25,323; Realty, Finance, and FMCG Stocks Lead the Charge | बाजारात 'सुपर वेन्सडे'! सेन्सेक्स ८२,६०० पार; गुंतवणूकदारांनी एकाच दिवसात कमावले ४.२९ लाख कोटी

बाजारात 'सुपर वेन्सडे'! सेन्सेक्स ८२,६०० पार; गुंतवणूकदारांनी एकाच दिवसात कमावले ४.२९ लाख कोटी

Share Market Today : अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कपात करण्याचे संकेत दिल्यामुळे भारतीय शेअर बाजारात बुधवारी, १५ ऑक्टोबर रोजी जबरदस्त तेजी दिसून आली. गुंतवणूकदारांनी बँकिंग, रिअल्टी आणि एफएमसीजी शेअर्समध्ये जोरदार खरेदी केल्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी विक्रमी उच्चांकावर बंद झाले.

बाजार विक्रमी पातळीवर
कारोबारअखेर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ५७५.४५ अंकांनी वाढून ८२,६०५.४३ च्या पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १७८.०५ अंकांनी वाढून २५,३२३.५५ या नव्या विक्रमी स्तरावर पोहोचला.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठा फायदा
बाजारात आलेल्या या तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली. बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण मार्केट कॅपिटलायझेशन मंगळवारच्या ४५९.६७ लाख कोटी रुपयांवरून वाढून ४६३.९६ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. याचा अर्थ, एकाच दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे ४.२९ लाख कोटी रुपयांची भर पडली.

क्षेत्रीय निर्देशांकांची स्थिती
निफ्टी रिअल्टी इंडेक्समध्ये सर्वात जास्त ३% हून अधिक वाढ नोंदवली गेली. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस आणि एफएमसीजी इंडेक्स १% पेक्षा जास्त वाढीसह बंद झाले. मेटल, कंझ्युमर ड्युरेबल्स, पीएसयू बँक, आयटी आणि ऑईल अँड गॅस क्षेत्रांमध्येही मध्यम तेजी पाहायला मिळाली. दुसरीकडे, निफ्टी मीडिया इंडेक्स ०.६% ने घसरला, तर फार्मा आणि हेल्थकेअर इंडेक्स जवळपास स्थिर राहिले.

सेन्सेक्समधील प्रमुख शेअर्सची कामगिरी

सर्वाधिक तेजी असलेले शेअर्स वाढ (%)
बजाज फायनान्स४.०३%
बजाज फिनसर्व३.१०%
एशियन पेंट्स२.४९%
लार्सन अँड टुब्रो२.२५%
ट्रेंट२.१९%

आज सेन्सेक्समधील ३० पैकी २३ शेअर्समध्ये वाढ झाली. तर टाटा मोटर्स, इन्फोसिस, ॲक्सिस बँक, टेक महिंद्रा आणि कोटक महिंद्रा बँक यांसारख्या ७ शेअर्समध्ये घसरण झाली.

बाजारातील एकूण चित्र
बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर एकूण ४,३२६ शेअर्समध्ये व्यवहार झाला. यातील २,५१० शेअर्सनी वाढ नोंदवली, तर १,६५२ शेअर्समध्ये घसरण झाली. तसेच, आज १४९ शेअर्सनी आपला ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला, तर १३७ शेअर्सनी ५२ आठवड्यांचा नीचांक गाठला.

वाचा - म्युच्युअल फंड सोडा, आता थेट 'शेअर एसआयपी'चा पर्याय; तुमच्यासाठी कोणता फायदेशीर?

जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत मिळाल्याने भारतीय बाजारात आत्मविश्वास परतला आहे. आगामी तिमाही निकाल आणि जागतिक मध्यवर्ती बँकांच्या धोरणांवर बाजाराची पुढील दिशा अवलंबून असेल.

Web Title : शेयर बाजार में उछाल: 'सुपर वेडनसडे' पर निवेशकों को बड़ा फायदा

Web Summary : अमेरिकी फेडरल रिजर्व के ब्याज दर में कटौती के संकेत के बाद भारतीय शेयर बाजार में तेजी आई। बैंकिंग, रियल्टी और एफएमसीजी शेयरों में खरीदारी से सेंसेक्स 82,600 के पार। निवेशकों को एक ही दिन में ₹4.29 लाख करोड़ का लाभ।

Web Title : Stock Market Rallies: Sensex Surges, Investors Gain Big on 'Super Wednesday'

Web Summary : Indian stock market soared after the US Federal Reserve hinted at rate cuts. Sensex crossed 82,600, driven by banking, realty, and FMCG stocks. Investors gained ₹4.29 lakh crore in a single day. Realty index led sectoral gains.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.