Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > सेन्सेक्समधील ६ कंपन्यांचे ३ लाख कोटी स्वाहा! टाटा समुहातील मौल्यवान कंपनीला सर्वाधिक फटका

सेन्सेक्समधील ६ कंपन्यांचे ३ लाख कोटी स्वाहा! टाटा समुहातील मौल्यवान कंपनीला सर्वाधिक फटका

Market Cap Update : टीसीएस व्यतिरिक्त, इन्फोसिस, एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, भारतीय जीवन विमा महामंडळ आणि भारती एअरटेल यांचे बाजार भांडवल गेल्या आठवड्यात घसरले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 16:16 IST2026-02-15T16:10:27+5:302026-02-15T16:16:09+5:30

Market Cap Update : टीसीएस व्यतिरिक्त, इन्फोसिस, एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, भारतीय जीवन विमा महामंडळ आणि भारती एअरटेल यांचे बाजार भांडवल गेल्या आठवड्यात घसरले.

Market Cap Update: Top 6 Sensex Companies Lose ₹3 Lakh Crore in One Week | सेन्सेक्समधील ६ कंपन्यांचे ३ लाख कोटी स्वाहा! टाटा समुहातील मौल्यवान कंपनीला सर्वाधिक फटका

सेन्सेक्समधील ६ कंपन्यांचे ३ लाख कोटी स्वाहा! टाटा समुहातील मौल्यवान कंपनीला सर्वाधिक फटका

Market Cap Update : गेल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात मोठी अस्थिरता पाहायला मिळाली. सेन्सेक्समधील पहिल्या १० पैकी ६ दिग्गज कंपन्यांच्या बाजार भांडवलात तब्बल ३,००,७०६ कोटी रुपयांची घट झाली आहे. आयटी आणि बँकिंग क्षेत्रातील काही बड्या शेअर्समध्ये झालेल्या विक्रीमुळे बेंचमार्क इंडेक्स सेन्सेक्स ९५३.६४ अंकांनी (१.१४ टक्के) घसरून बंद झाला. विशेष म्हणजे, आयटी क्षेत्रातील दिग्गज 'टीसीएस'ला सर्वाधिक फटका बसला असताना, 'भारतीय स्टेट बँक' मात्र गुंतवणूकदारांसाठी फायद्याची ठरली आहे.

'टीसीएस' आणि 'इन्फोसिस'ला सर्वाधिक फटका
आयटी क्षेत्रातील मंदीच्या संकेतांमुळे टाटा समूहाची प्रमुख कंपनी टीसीएसच्या बाजार भांडवलात सर्वात मोठी घसरण झाली.

  • टीसीएस : कंपनीचे बाजार भांडवल ९०,१९८.९२ कोटींनी घटून ९,७४,०४३.४३ कोटी रुपयांवर आले.
  • इन्फोसिस : ७०,७८०.२३ कोटींच्या नुकसानीसह बाजार भांडवल ५,५५,२८७.७२ कोटींवर स्थिरावले.
  • इतर कंपन्या : एचडीएफसी बँक (५४,६२७ कोटी), रिलायन्स इंडस्ट्रीज (४१,८८३ कोटी), एलआयसी (२३,९७१ कोटी) आणि भारती एअरटेल (१९,२४४ कोटी) यांच्या मूल्यांकनातही मोठी घट झाली.

'एसबीआय'ची जोरदार मुसंडी; १.२२ लाख कोटींची वाढ
बाजार घसरत असतानाही काही कंपन्यांनी गुंतवणूकदारांना मालामाल केले. यात सरकारी क्षेत्रातील भारतीय स्टेट बँकेने बाजी मारली आहे.

  • एसबीआय : बँकेच्या मार्केट कॅपमध्ये १,२२,२१३.३८ कोटी रुपयांची बंपर वाढ झाली असून, ते आता ११,०६,५६६.४४ कोटींवर पोहोचले आहे.
  • बजाज फायनान्स : २६,४१४.४४ कोटींची वाढ नोंदवत ६,३७,२४४.६४ कोटींवर मजल मारली.
  • इतर कंपन्या : लार्सन अँड टुब्रो (१४,४८३ कोटी) आणि आयसीआयसीआय बँक (५,७१९ कोटी) यांनीही बाजार भांडवलात भर टाकली.

साप्ताहिक बाजार भांडवल स्थिती (एका नजरेत)

कंपनी (नफा) वाढ (कोटी ₹) कंपनी (तोटा) घट (कोटी ₹) 
एसबीआय + १,२२,२१३ टीसीएस - ९०,१९८ 
बजाज फायनान्स+ २६,४१४इन्फोसिस - ७०,७८०
लार्सन अँड टुब्रो+ १४,४८३एचडीएफसी बँक- ५४,६२७
आयसीआयसीआय बँक+ ५,७१९रिलायन्स इंडस्ट्री- ४१,८८३

वाचा - 'टेक' कंपन्या म्हणजे आधुनिक 'ईस्ट इंडिया कंपनी'! झोहोच्या संस्थापक श्रीधर वेंबू यांचा सरकारला इशारा
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title : सेंसेक्स की कंपनियों को ₹3 लाख करोड़ का नुकसान; टाटा की टीसीएस को सबसे ज्यादा मार

Web Summary : भारतीय बाजारों में अस्थिरता देखी गई, सेंसेक्स की छह कंपनियों को ₹3 लाख करोड़ का नुकसान हुआ। टीसीएस को सबसे बड़ा नुकसान हुआ। एसबीआई और बजाज फाइनेंस को काफी फायदा हुआ। आईटी सेक्टर में मंदी से बाजार में गिरावट आई।

Web Title : Sensex Companies Lose ₹3 Lakh Crore; Tata Group's TCS Hit Hardest

Web Summary : Indian markets saw volatility, with six Sensex firms losing ₹3 lakh crore. TCS faced the biggest loss. SBI and Bajaj Finance gained significantly. IT sector slowdown major reason for market decline.