Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?

दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?

Stock Market : गेल्या आठवड्यात शेअर बाजारात जवळपास २% वाढ झाली आहे. परिणामी, देशातील टॉप सात कंपन्यांचे मार्केट कॅप २ लाख कोटींपेक्षा जास्त वाढले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 16:57 IST2025-10-19T16:50:49+5:302025-10-19T16:57:57+5:30

Stock Market : गेल्या आठवड्यात शेअर बाजारात जवळपास २% वाढ झाली आहे. परिणामी, देशातील टॉप सात कंपन्यांचे मार्केट कॅप २ लाख कोटींपेक्षा जास्त वाढले आहे.

Market Cap Surge Top 7 Indian Companies Add ₹2.16 Lakh Crore in Pre-Diwali Rally; RIL Leads Gains | दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?

दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?

Stock Market : गेल्या वर्षभरापासून अस्थिर असलेल्या शेअर बाजारात या आठवड्यात चांगली वाढ पाहायला मिळाली. संपूर्ण देशात दिवाळीचा उत्साह संचारलेला असताना, त्याचा परिणाम शेअर बाजारातही दिसून आला आहे. दिवाळीपूर्व आठवड्यात शेअर बाजारात जबरदस्त तेजी अनुभवायला मिळाली. या तेजीमुळे देशातील अव्वल १० कंपन्यांपैकी ७ कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठी वाढ नोंदवली गेली आहे.

आकडेवारीनुसार, या एका आठवड्यात टॉप १० मधील ७ कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये एकूण २,१६,५४४.२९ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. तर, दुसरीकडे ३ कंपन्यांच्या बाजार मूल्याला ६१,७९८.२३ कोटी रुपयांचा फटका बसला आहे. विशेष म्हणजे, देशातील आयटी कंपन्यांना सर्वाधिक नुकसान झाले आहे.

बाजाराला IPO चा आणि FII चा आधार
बाजारातील या वाढीला देशात आलेल्या दोन मोठ्या आयपीओला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे आणि विदेशी गुंतवणूकदारांच्या वाढलेल्या खरेदीमुळे मोठा आधार मिळाला आहे. आठवड्याभरात बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स १.७५ टक्क्यांनी तर नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा प्रमुख निर्देशांक निफ्टी सुमारे २ टक्क्यांनी वधारला.

या कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये मोठी वाढ

कंपनीचे नावमार्केट कॅपमधील वाढ (कोटी रुपये) आठवड्यानंतरचे मार्केट कॅप (कोटी रुपये)
रिलायन्स इंडस्ट्रीज४७,३६३.६५१९,१७,४८३.७१
भारती एअरटेल४१,२५४.७३११,४७,२३५.०८
आयसीआयसीआय बँक४०,१२३.८८१०,२६,४९१.३५
एचडीएफसी बँक३३,१८५.५९१५,४०,२१०.७८
बजाज फायनान्स२८,९०३.४५६,६५,८९९.१९
हिंदुस्थान युनिलिव्हर१७,७७४.६५६,१२,००९.७८
भारतीय स्टेट बँक७,९३८.३४८,२०,९२४.९८

रिलायन्स इंडस्ट्रीजने या आठवड्यात सर्वाधिक फायदा मिळवत आपले पहिले स्थान कायम राखले आहे.

या कंपन्यांना झाला तोटा
बाजारात तेजी असूनही देशातील तीन मोठ्या कंपन्यांच्या बाजार मूल्यात घट झाली आहे.

  • इन्फोसिस : कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये ३०,३०६.३५ कोटी रुपयांची मोठी घट झाली. (नवीन M-Cap: ५,९८,७७३.८७ कोटी)
  • टीसीएस : टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला २३,८०७.०१ कोटी रुपयांचे नुकसान झाले. (नवीन M-Cap: १०,७१,८९४.६१ कोटी)
  • एलआयसी : सरकारी विमा कंपनी एलआयसीचे मूल्यांकन ७,६८४.८७ कोटी रुपयांनी घटले. (नवीन M-Cap: ₹५,६०,१७३.४२ कोटी)
  • आयटी कंपन्यांच्या तिमाही निकालांनंतर त्यांच्या महसुलाच्या अंदाजामुळे गुंतवणूकदारांमध्ये काहीशी निराशा दिसून आली, त्यामुळे या क्षेत्रात विक्रीचा दबाव वाढला.

वाचा - सोमवारी बँक सुरू की बंद? दिवाळीच्या दिवशी बँकेत जाण्यापूर्वी RBI ची सुट्टीची यादी नक्की तपासा!

  • रिलायन्स इंडस्ट्रीज पहिल्या स्थानावर कायम असून, त्यानंतर अनुक्रमे एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, टीसीएस, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, बजाज फायनान्स, एचयूएल, इन्फोसिस आणि एलआयसी यांचा क्रमांक लागतो.

Web Title : दिवाली धमाका: त्यौहार से पहले शीर्ष 10 कंपनियों का मार्केट कैप बढ़ा

Web Summary : दिवाली से पहले शेयर बाजार में तेजी देखी गई। रिलायंस इंडस्ट्रीज के नेतृत्व में शीर्ष कंपनियों के बाजार पूंजीकरण में ₹2.16 लाख करोड़ की वृद्धि हुई। निराशाजनक कमाई के पूर्वानुमान के कारण आईटी कंपनियों को नुकसान हुआ। आईपीओ और एफआईआई प्रवाह ने बाजार में तेजी लाई।

Web Title : Diwali Bonanza: Market Cap of Top 10 Firms Surges Before Festival

Web Summary : Ahead of Diwali, the stock market witnessed a significant rally. Top companies saw their market capitalization increase by ₹2.16 lakh crore, led by Reliance Industries. IT firms faced losses due to disappointing earnings forecasts. IPOs and FII inflows fueled the market surge.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.