Manas Polymers Listing: मानस पॉलिमर्स अँड एनर्जीज लिमिटेडच्या आयपीओला उत्तम लिस्टिंग मिळाली आहे. या एसएमई सेगमेंटचा आयपीओ एनएसई एसएमईवर १५३.९० रुपयांना म्हणजेच ९० टक्के प्रीमियमसह लिस्ट झाला. लिस्टिंगनंतर कंपनीचे शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंग दिसून आलं. त्यामुळे काही वेळानंतर मानस पॉलिमर्स अँड एनर्जीज लिमिटेडचे शेअर्स लोअर सर्किटमध्ये आले. ५ टक्क्यांच्या घसरणीनंतर कंपनीच्या शेअर्सची किंमत बीएसईवर १४६.२० रुपयांवर आली. मानस पॉलिमर्स अँड एनर्जीज लिमिटेडच्या आयपीओचा प्राइस बँड ७६ रुपये ते ८१ रुपये प्रति शेअर असा निश्चित करण्यात आला होता.
२६ सप्टेंबरला उघडलेला आयपीओ
कंपनीचा आयपीओ २६ सप्टेंबर रोजी किरकोळ गुंतवणूकदारांसाठी खुला होता. गुंतवणूकदारांना ३० सप्टेंबरपर्यंत आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची संधी होती. कंपनीनं १,६०० शेअर्सचा एकच लॉट तयार केला होता. तथापि, कोणत्याही किरकोळ गुंतवणूकदाराला एकाच वेळी किमान ३,२०० शेअर्समध्ये गुंतवणूक करणं आवश्यक होतं. परिणामी, किमान गुंतवणूक रक्कम ₹२५९,२०० होती.
प्रतीक्षा संपली! तुमच्या खिशात आहेत का १४,९९६ रुपये? तर बनू शकता टाटांच्या कंपनीचे प्रॉफिट पार्टनर
मानस पॉलिमर्स अँड एनर्जीज लिमिटेडची आयपीओ साईज ₹२३.५२ कोटी होती. कंपनीनं आयपीओद्वारे २९ लाख नवीन शेअर्स जारी केले. याचा अर्थ असा की विद्यमान गुंतवणूकदारांनी आयपीओमध्ये त्यांचे शेअर्स विकले नाहीत.
१.२४ पटींपेक्षा अधिक सबस्क्राइब
तीन दिवसांच्या सुरुवातीदरम्यान आयपीओ १.२४ पटींपेक्षा अधिक सबस्क्राइब झाला. कंपनीचा आयपीओ रिटेल श्रेणीमध्ये १९ टक्के सबस्क्राइब झाला. क्यूआयबी श्रेणीमध्ये ६.६६ पट सबस्क्राइब झाला. एनआयआय श्रेणीमध्ये १.७८ पट जास्त सबस्क्राइब झाला. ही कंपनी २०२४ मध्ये स्थापन झाली. ही कंपनी पीईटी परफॉर्मन्स, बाटल्या, जार आणि कॅप्स इत्यादींचं उत्पादन करते.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)