Mamata Machinery IPO Listing: ममता मशिनरीनं शेअर बाजारात धमाकेदार एन्ट्री केली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे पैसे पहिल्याच दिवशी दुप्पट झालेत. ममता मशिनरीचे शेअर्स बीएसई आणि एनएसईवर १४६.९१ टक्क्यांच्या प्रीमियमवर ६०० रुपये प्रति शेअर दराने लिस्ट झाले. लिस्टिंगनंतर कंपनीच्या शेअर्सला ५ टक्क्यांचं अपर सर्किट लागलं. ज्यानंतर कंपनीच्या शेअर्सची किंमत बीएसईमध्ये ६२९.९५ रुपये आणि एनएसईमध्ये ६३० रुपयांच्या पातळीवर पोहोचली. कंपनीची इश्यू प्राइस २३० ते २४३ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली होती. इश्यू प्राइसपासून कंपनीच्या शेअरची किंमत जवळपास १६० टक्क्यांनी वाढली आहे.
१७९.३९ कोटींची इश्यू साईज
कंपनीचा इश्यू साइज १७९.३९ कोटी रुपये होती. कंपनीनं आयपीओच्या माध्यमातून ७४ लाख शेअर्स जारी केले. हे शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत जारी करण्यात आले आहेत. ममता मशिनरीचा आयपीओ १९ डिसेंबररोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला. कंपनीचा आयपीओ २३ डिसेंबरपर्यंत किरकोळ गुंतवणूकदारांसाठी खुला होता.
ममता मशिनरीच्या आयपीओचा लॉट साइज ६१ शेअर्सची होती. त्यामुळे गुंतवणूकदारांना किमान १४ हजार ८२३ रुपयांची गुंतवणूक करावी लागली असती. कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना एका शेअरवर १२ रुपयांची सूट दिली होती.
१९० टक्क्यांपेक्षा अधिक सबस्क्रिप्शन
ममता मशिनरीचा आयपीओ ३ दिवसांत १९४ पटींपेक्षा अधिक सब्सक्राइब झाला. हा आयपीओ कर्मचारी कोट्यात १५३ पट आणि किरकोळ श्रेणीत १३८ पट सबस्क्राइब करण्यात आला होता. कंपनीचा आयपीओ १८ डिसेंबर रोजी अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला झाला. त्यानंतर कंपनीने अँकर गुंतवणूकदारांकडून ५३.५६ कोटी रुपये उभारले होते.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)