Mamata Machinery IPO GMP : २०२४ या वर्षात मोठ्या प्रमाणात आयपीओ आले. अनेक आयपीओंनी आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केलंय. तर काही आयपीओंनी गुंतवणूकदारांचं नुकसान केलंय. दरम्यान, ममता मशिनरीचा आयपीओ हा १७९.३९ कोटी रुपयांचा बुक बिल्ड इश्यू आहे. १९ डिसेंबरला हा आयपीओ सब्सक्रिप्शनसाठी उघडला आणि २३ डिसेंबरला बंद झाला.
आयपीओला गुंतवणूकदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि तो १९४.९५ पट सब्सक्राइब झाला. रिटेल कॅटेगरीमध्ये १३८.०८ पट, एनआयआय कॅटेगरीमध्ये २७४.३८ पट आणि क्यूआयबी कॅटेगरीला २३५.८८ पट सबस्क्रिप्शन मिळालं. शेअरचं वाटप अंतिम झालं असून २७ डिसेंबर रोजी बीएसई, एनएसई एक्स्चेंजमध्ये हे शेअर्स दाखल होतील.
बाजारातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनलिस्टेड मार्केटमध्ये ममता मशिनरीचा आयपीओ जीएमपी २५५ रुपये आहे, जो कॅप प्राईजपेक्षा १०४.९ टक्के जास्त आहे. सध्याचा जीएमएमपी ममता मशिनरी आयपीओच्या शेअरची अपेक्षित लिस्टिंग किंमत ४९८ रुपये असू शकते असे संकेत देत आहे. ज्यांना हे शेअर्स अलॉट झाले आहेत त्यांना लिस्टिंगच्या दिवशी बंपर नफा मिळू शकतो.
जीएमपीमुळे ममता मशिनरीचा आयपीओ सतत चर्चेत राहिला आहे. कंपनीनं प्रति शेअर २३० ते २४३ रुपये प्राइस बँड निश्चित केला होता.
(टीप : यामध्ये केवळ सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)