Mamata Machinery IPO Details: वर्ष अखेरीस ममता मशिनरी कंपनी आयपीओ घेऊन येत आहे. १९ डिसेंबर रोजी ममता मशिनरी कंपनीचा खुला होणार असून, २३ डिसेंबरपर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुला असणार आहे. गुंतवणूकदार कमीत कमी एक तर जास्तीत जास्त १३ लॉटसाठी अर्ज करू शकणार आहेत.
ममता मशिनरी आयपीओ माहिती
ममता मशिनरी कंपनी आयपीओतून १७९.३९ कोटी रुपये उभारणार आहे. कंपनीच्या आयपीओची प्राइज बँड २३०-२४३ रुपये प्रति शेअर असणार आहे. गुंतवणुकदारांना एका लॉटमध्ये ६१ शेअर्ससाठी गुंतवणूक करावी लागणार असून, १४ हजार ८२३ रुपये एका लॉटची किंमत असणार आहे.
ममता मशिनरी कंपनी काय करते?
आयपीओ घेऊन येत असलेली ममता मशिनरी लिमिटेड कंपनी मॅन्युफॅक्चरिंग सोल्युशन (दुकानातील मजल्यावरील प्रक्रियांचे परीक्षण आणि सुधारणा करण्यासाठी प्रगत, रिअल टाइम, पेपरलेस उत्पादन नियंत्रण पायाभूत सुविधा) क्षेत्रात काम करते. बॅग, पाऊच आणि पॅकेजिंग मशिनरी उत्पादनांचा यात समावेश आहे.
१९७९ मध्ये कंपनीची स्थापना झालेली आहे. कंपनी एफएमसीजी, अन्न आमि ग्राहक उत्पादने तयार करणाऱ्या कंपन्यांना पॅकेजिंग करणाऱ्या मशिनरी विकते. उत्पादनाबरोबरच कंपनी विक्रीनंतरची सेवाही पुरवते. कंपनी सध्या ७५ देशात काम करते. भारत आणि अमेरिकेत कंपनीचे नेटवर्क मजबूत आहे.
२०२४ या आर्थिक वर्षात कंपनीने आपल्या महसूलापैकी ६५ टक्क्यांहून जास्त महसूल निर्यातीतून मिळवला आहे. पॅकेजिंग मशीन एक्सपोर्ट करण्यात कंपनी सातव्या स्थानी आहे. कंपनीचा जागतिक स्तरावर ग्राहक बेस असून, अमेरिका, युनायटेड अरब अमिराती, पोलंड आणि स्पेनमधील ग्राहकांचा समावेश आहे.
कंपनीच्या कमकुवत बाजू
भारतीय पॅकेजिंग मार्केटची दोन अंकी वाढ होण्याची आशा आहे. पण, पॅकेजिंग मशिनरी मार्केटमध्ये २०२७ पर्यंत २ टक्केच वाढ होण्याचा अंदाज आहे. त्याशिवाय कंपनीला या क्षेत्रात सुक्ष्म, मध्यम आणि मोठ्या कंपन्यांच्या आव्हानाचा सामना करावा लागत आहे.
ममता मशिनरी लिमिटेड १७९ कोटी रुपयांचा आयपीओ घेऊन येत आहे. व्हॅल्यू रिसर्चच्या रिपोर्टनुसार, २०२२ या आर्थिक वर्षात कंपनीचा महसूल १९२ कोटी होता, तो २०२३ या आर्थिक वर्षात वाढून २०१ कोटी रुपयांवर पोहोचला. २०२४ मध्ये कंपनीचा महसूल २३७ कोटी इतका होता.
टीप - ही फक्त अर्थ साक्षरतेच्या दृष्टीने कंपनी आणि आयपीओ माहिती दिलेली आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या.