Lokmat Money >शेअर बाजार > डिविडंड देणारी 'ही' कंपनी आता देणार बोनस शेअर्स, रकॉर्ड डेट पुढच्या आठवड्यातच

डिविडंड देणारी 'ही' कंपनी आता देणार बोनस शेअर्स, रकॉर्ड डेट पुढच्या आठवड्यातच

M M Forgings Ltd Share Price :  पुढील काही दिवसांत या कंपनीचे शेअर्स एक्स-बोनस स्टॉक म्हणून व्यवहार करतील. कंपनीनं या बोनस इश्यूची रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 11:08 AM2024-07-11T11:08:55+5:302024-07-11T11:09:54+5:30

M M Forgings Ltd Share Price :  पुढील काही दिवसांत या कंपनीचे शेअर्स एक्स-बोनस स्टॉक म्हणून व्यवहार करतील. कंपनीनं या बोनस इश्यूची रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे.

M M Forgings Ltd Share dividend paying company will now issue bonus shares record date next week itself | डिविडंड देणारी 'ही' कंपनी आता देणार बोनस शेअर्स, रकॉर्ड डेट पुढच्या आठवड्यातच

डिविडंड देणारी 'ही' कंपनी आता देणार बोनस शेअर्स, रकॉर्ड डेट पुढच्या आठवड्यातच

M M Forgings Ltd Share Price :  पुढील काही दिवसांत एमएम फोर्जिंग्सचे शेअर्स एक्स-बोनस स्टॉक म्हणून व्यवहार करतील. कंपनीनं या बोनस इश्यूची रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, १ शेअरसाठी १ शेअर बोनस म्हणून देण्यात येणार आहे. गेल्या महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये एक्स-डिव्हिडंडचा व्यवहार झाला होता. कंपनीच्या शेअर्समध्ये आज २ टक्क्यांहून अधिक वाढ पाहायला मिळाली आहे.

एनएसईवर एमएम फोर्जिंग्सचा शेअर १३२० रुपयांवर खुला झाला. पण थोड्याच वेळात हा शेअर १३२४.७० रुपयांच्या पातळीवर पोहोचला. हे कंपनीच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकी १३५२ रुपये (३ जुलै २०२४) पातळीच्या अगदी जवळ आहे.

केव्हा एक्स बोनस ट्रेड करणार कंपनी?

कंपनीनं शेअर बाजारांना दिलेल्या माहितीनुसार १ शेअरसाठी १ शेअर बोनस म्हणून दिला जाईल. कंपनीनं बोनस इश्यूसाठी १६ जुलै ही विक्रमी तारीख निश्चित केली आहे. या दिवशी ज्या पात्र गुंतवणूकदारांची नावं कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये राहतील त्यांना बोनस शेअर्सचा लाभ मिळणार आहे.

शेअर बाजारातील कामगिरी कशी?

एमएम फोर्जिंगच्या शेअरच्या किंमतीत गेल्या सहा महिन्यांत ३१.८० टक्के वाढ झाली. तर ज्या गुंतवणूकदारांनी एक वर्ष हा शेअर ठेवला आहे, त्यांना आतापर्यंत ४२.७० टक्के वाढ झाली आहे. एमएम फोर्जिंगची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ८२५ रुपये आहे. कंपनीचं मार्केट कॅप ३१६२ कोटी रुपये आहे. गेल्या महिन्यातच या शेअरनं शेअर बाजारात एक्स डिविडंड स्टॉक म्हणून व्यवहार केला होता. १४ जून २०२४ रोजी एक्स-डिव्हिडंड ट्रेड केली होती. त्यानंतर कंपनीनं पात्र गुंतवणूकदारांना प्रति शेअर ८ रुपये लाभांश दिला.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: M M Forgings Ltd Share dividend paying company will now issue bonus shares record date next week itself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.