Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > उघडण्यापूर्वीच घाबरवतोय GMP; ग्रे मार्केटमध्ये शेअरची वाईट स्थिती, या वर्षाचा आहे बहुप्रतीक्षित IPO

उघडण्यापूर्वीच घाबरवतोय GMP; ग्रे मार्केटमध्ये शेअरची वाईट स्थिती, या वर्षाचा आहे बहुप्रतीक्षित IPO

Lenskart Solutions Ltd IPO GMP: या आयपीओचा प्राइस बँड प्रति शेअर ₹३८२ ते ₹४०२ निश्चित करण्यात आला आहे. आयपीओ उघडण्याच्या अगदी आधी, ग्रे मार्केटमध्ये कंपनीच्या शेअर्सच्या प्रीमियममध्ये मोठी घसरण झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 15:42 IST2025-10-30T15:42:10+5:302025-10-30T15:42:10+5:30

Lenskart Solutions Ltd IPO GMP: या आयपीओचा प्राइस बँड प्रति शेअर ₹३८२ ते ₹४०२ निश्चित करण्यात आला आहे. आयपीओ उघडण्याच्या अगदी आधी, ग्रे मार्केटमध्ये कंपनीच्या शेअर्सच्या प्रीमियममध्ये मोठी घसरण झाली आहे.

Lenskart Solutions Ltd IPO GMP is frightening even before opening Bad condition of shares in the gray market this year s much awaited IPO | उघडण्यापूर्वीच घाबरवतोय GMP; ग्रे मार्केटमध्ये शेअरची वाईट स्थिती, या वर्षाचा आहे बहुप्रतीक्षित IPO

उघडण्यापूर्वीच घाबरवतोय GMP; ग्रे मार्केटमध्ये शेअरची वाईट स्थिती, या वर्षाचा आहे बहुप्रतीक्षित IPO

Lenskart Solutions Ltd IPO: आयवेअर रिटेलर लेन्सकार्ट सोल्युशन्स लिमिटेडचा (Lenskart Solutions Ltd.) आयपीओ सध्या बाजारात जबरदस्त चर्चेत आहे. अँकर गुंतवणूकदारांसाठी बोली आजपासून सुरू होत आहे, तर सामान्य गुंतवणूकदारांसाठी हा आयपीओ उद्या, ३१ ऑक्टोबरपासून ४ नोव्हेंबरपर्यंत खुला राहील. या आयपीओचा प्राइस बँड प्रति शेअर ₹३८२ ते ₹४०२ निश्चित करण्यात आला आहे. आयपीओ उघडण्याच्या अगदी आधी, ग्रे मार्केटमध्ये कंपनीच्या शेअर्सच्या प्रीमियममध्ये मोठी घसरण झाली आहे. सध्या कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये सुमारे १२% प्रीमियमवर ट्रेड होत आहेत.

सविस्तर माहिती

लेन्सकार्टचा जीएमपी ₹१०८ वरून घसरून प्रति शेअर ₹४८ वर आला आहे. याचा अर्थ, ₹४०२ च्या इश्यू किमतीच्या तुलनेत शेअर आता सुमारे १२% प्रीमियमवर ट्रेड करत आहे. ही घसरण दर्शवते की लिस्टिंगपूर्वी गुंतवणूकदारांची भावना थोडी नरम झाली आहे, तरीही लिस्टिंगवर नफा मिळण्याची अपेक्षा अजूनही कायम आहे. ग्रे मार्केट हे एक अनौपचारिक जागा आहे जिथे आयपीओ वाटप होण्यापूर्वी आणि लिस्टिंगच्या दिवसापर्यंत शेअर्सची खरेदी-विक्री सुरू राहते. गुंतवणूकदार ग्रे मार्केट प्रीमियमच्या माध्यमातून संभाव्य लिस्टिंग नफ्याचा अंदाज लावतात.

… तर ३१ ऑक्टोबरनंतर बंद होणार तुमचा FASTag, टोल नाक्यावर दुप्पट टोल भरण्याची येऊ शकते वेळ

₹७,२७८ कोटी जमा करण्याची योजना

सॉफ्टबँक ग्रुप कॉर्पचा पाठिंबा लेन्सकार्ट आपल्या आयपीओद्वारे एकूण ₹७,२७८.०२ कोटी जमा करण्याची योजना आखत आहे. यातून कंपनीचं पोस्ट-इश्यू मूल्यांकन सुमारे ₹६९,७४१ कोटींपर्यंत पोहोचू शकते. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी १०% हिस्सा आरक्षित ठेवण्यात आला आहे. एका लॉटमध्ये ३७ शेअर्स असतील आणि किमान गुंतवणुकीची रक्कम ₹१४,८७४ निश्चित करण्यात आली आहे.

फ्रेश इश्यू आणि ओएफएस (OFS)

लेन्सकार्टच्या आयपीओमध्ये ₹२,१५० कोटींचा फ्रेश इश्यू समाविष्ट आहे. तसंच, सध्याचं गुंतवणूकदार १२.७६ कोटी शेअर्सचा ऑफर फॉर सेल (OFS) आणतील. ओएफएसमध्ये हिस्सा विकणाऱ्यांमध्ये संस्थापक आणि सीईओ पीयूष बन्सल, सॉफ्टबँकचा एसव्हीएफ II लाईटबल्ब (केमन), केदारा कॅपिटल, क्रिसकॅपिटलचा पीआय अपॉर्च्युनिटीज फंड II, केकेआरचा मॅकरिची इन्वेस्टमेंट्स, आणि अल्फा वेव्ह व्हेंचर्स यांचा समावेश आहे.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title : Lenskart IPO: खुलने से पहले GMP में गिरावट; बहुप्रतीक्षित IPO

Web Summary : Lenskart IPO के खुलने से पहले ग्रे मार्केट प्रीमियम में गिरावट आई है। ₹382-₹402 के प्राइस बैंड वाला ₹7,278 करोड़ का IPO जल्द ही खुलेगा। GMP गिरकर ₹48 पर पहुंचा, जो निवेशकों की नरम भावनाओं को दर्शाता है, हालांकि लिस्टिंग लाभ अभी भी अपेक्षित हैं। IPO में फ्रेश इश्यू और OFS शामिल हैं।

Web Title : Lenskart IPO: GMP dips before opening; a much-awaited IPO

Web Summary : Lenskart's IPO sees reduced grey market premium before opening. The ₹7,278 crore IPO, with a price band of ₹382-₹402, opens soon. GMP dropped to ₹48, indicating softened investor sentiment, though listing gains are still expected. The IPO includes fresh issue and OFS.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.