Lokmat Money >शेअर बाजार > 'हा' रेल्वे स्टॉक सूसाट, कंपनीला मिळाली मार्केट कॅपपेक्षा मोठी ऑर्डर; 6 महिन्यांत 200% परतावा

'हा' रेल्वे स्टॉक सूसाट, कंपनीला मिळाली मार्केट कॅपपेक्षा मोठी ऑर्डर; 6 महिन्यांत 200% परतावा

Railway Stocks: गेल्या 5 वर्षांमध्ये शेअरने गुंतवणूकदारांना 5154% चा मजबूत परतावा दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 19:51 IST2024-12-06T19:50:36+5:302024-12-06T19:51:01+5:30

Railway Stocks: गेल्या 5 वर्षांमध्ये शेअरने गुंतवणूकदारांना 5154% चा मजबूत परतावा दिला आहे.

'Kernex Microsystems' railway stock rise, company gets orders bigger than market cap; 200% return in 6 months | 'हा' रेल्वे स्टॉक सूसाट, कंपनीला मिळाली मार्केट कॅपपेक्षा मोठी ऑर्डर; 6 महिन्यांत 200% परतावा

'हा' रेल्वे स्टॉक सूसाट, कंपनीला मिळाली मार्केट कॅपपेक्षा मोठी ऑर्डर; 6 महिन्यांत 200% परतावा

Kernex Microsystems: आज शेअर बाजार फ्लॅट नोटवर बंद झाला. यादरम्यान, ट्रांसपोर्ट क्षेत्रात सेवा देणारी केर्नेक्स मायक्रोसिस्टम्स (Kernex Microsystems) चे शेअर्स 5% ने वधारले. BSE वर हा शेअर 5% ने वाढून 1140.15 रुपयांवर पोहोचला. कंपनीचे शेअर्स वाढण्यामागे भारतीय रेल्वे (Indian Railways) कडून मिळालेली मोठी ऑर्डर आहे. कंपनीला आपल्या मार्केट कॅपपेक्षा जास्त किमतीती ऑर्डर मिळाली आहे. विशेष म्हणजे, या शेअरने गेल्या 6 महिन्यांत गुंतवणूकदारांना 200% रिटर्न दिले आहेत.

Kernex Microsystems ला मिळाली ₹2,041.4 कोटींची ऑर्डर 
एक्सचेंज फायलिंगमध्ये Kernex Microsystems ने दिलेल्या माहितीनुसार, चित्तरंजन लोकोमोटिव वर्क्स (Chittaranjan Locomotive Works) कडून ऑन-बोर्ड कवच (KAVACH) इक्विपमेंटसाठी 2,500 सेटचे सप्लाय, इंस्टॉलेशन, टेस्टिंग आणि कमीशनिंगसाठी ऑर्डर मिळाली आहे. या सेटची डिलिव्हरी पुढील 12 महिन्यात केली जाईल. या ऑर्डरची एकूण किंमत ₹2,041.4 कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे, ऑर्डरची किंमत कंपनीच्या मार्केट कॅपपेक्षा( ₹1,910.83 करोड़) जास्त आहे.

कंपनी काय करते?
Kernex Microsystems रेल्वेसाठी सुरक्षा प्रणाली आणि सॉफ्टवेअर सेवांचे उत्पादन आणि विक्री करते. कंपनीने आर्थिक वर्ष 2024-2025 च्या दुसऱ्या तिमाहीत 6.85 कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे, तर दुसऱ्या तिमाहीत 4.41 कोटींचा घाटा झाला होता. आर्थिक वर्ष 2025 च्या दुसऱ्या तिमाहीत विक्री वाढून 41.22 कोटी रुपये झाली, तर दुसऱ्या तिमाहीत ही 1.41 कोटी होती.

3 वर्षात 1246% रिटर्न दिला
Kernex Microsystems च्या शेअर्सने 6 महिन्यांत त्यांच्या भागधारकांना सुमारे 200% मल्टीबॅगर परतावा दिला आहे. शेअर 2 आठवड्यात 20%, 1 महिन्यात 43% आणि 3 महिन्यांत 33% पेक्षा जास्त वाढला आहे. तर या वर्षी आतापर्यंत स्टॉक 96% पेक्षा जास्त वाढला आहे. मागील एका वर्षात स्टॉकचा परतावा 95% होता, मागील 2 वर्षात तो 236% होता आणि मागील 3 वर्षात तो 1246% होता. तर, गेल्या 5 वर्षांमध्ये शेअरने गुंतवणूकदारांना 5154% चा मजबूत परतावा दिला आहे.

(टीप-शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: 'Kernex Microsystems' railway stock rise, company gets orders bigger than market cap; 200% return in 6 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.