Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 

पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 

Meesho IPO: बंगळुरूतील ई-कॉमर्स कंपनी मीशोला आपला आयपीओ लाँच करण्यासाठी भागधारकांची मंजुरी मिळाली आहे. पाहा काय आहे कंपनीचा प्लान?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 19:42 IST2025-06-28T19:41:43+5:302025-06-28T19:42:59+5:30

Meesho IPO: बंगळुरूतील ई-कॉमर्स कंपनी मीशोला आपला आयपीओ लाँच करण्यासाठी भागधारकांची मंजुरी मिळाली आहे. पाहा काय आहे कंपनीचा प्लान?

Keep your money ready e retailer Meesho IPO is coming soon what is the company s plan See the details | पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 

पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 

Meesho IPO: बंगळुरूतील ई-कॉमर्स कंपनी मीशोला आपला आयपीओ लाँच करण्यासाठी भागधारकांची मंजुरी मिळाली आहे. आता कंपनी मार्केट रेग्युलेटर सेबीकडे आपला ड्राफ्ट आयपीओ प्रॉस्पेक्टस दाखल करणार आहे. आयपीओच्या माध्यमातून ४२५० कोटी रुपये (सुमारे ५०० मिलियन डॉलर) भांडवल उभारण्याचं कंपनीचे उद्दिष्ट आहे.

संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय

आयपीओ प्रस्तावाबरोबरच कंपनीचे संस्थापक विदित अत्रे यांची अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्याच्या योजनेलाही मीशोच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. प्रस्तावित आयपीओमध्ये ४,२५० कोटी रुपयांपर्यंतचे इक्विटी शेअर्स नव्यानं जारी केले जातील आणि कंपनीच्या काही विद्यमान भागधारकांकडून इक्विटी शेअर्सच्या विक्रीची ऑफर दिली जाईल, असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

भागधारक कोण आहेत?

गुंतवणूकदार एलिव्हेशन कॅपिटल, पीक एक्सव्ही पार्टनर्स आणि प्रोसस मीशोच्या सर्वात मोठ्या संस्थात्मक भागधारकांपैकी एक आहेत, प्रत्येकाकडे १३-१५% हिस्सा आहे. या ई-रिटेलरमध्ये जपानी गुंतवणूकदार सॉफ्टबँकचा सुमारे १० टक्के हिस्सा आहे. कंपनीतील अन्य गुंतवणूकदारांमध्ये वेस्टब्रिज कॅपिटल, फिडेलिटी सारख्या गुंतवणूकदारांचा समावेश आहे.

Flipkart चादेखील आयपीओ येणार

मीशोची प्रतिस्पर्धी कंपनी फ्लिपकार्ट ही वॉलमार्टच्या मालकीची आहे. या कंपनीचा आयपीओ देखील लाँच होणार आहे. पुढील वर्षी आयपीओ येण्यापूर्वी कंपनी त्यांचं मुख्यालय सिंगापूरहून भारतात आणण्याच्या प्रक्रियेत आहे. दरम्यान, अनेक कंपन्या आणि ब्रँड सार्वजनिक होण्याची योजना आखत आहेत. यामध्ये ग्रो, पाइन लॅब्स, फिजिक्सवाला, अर्बन कंपनी, शिप्रॉकेट, बोट, वेकफिट आणि कॅपिलरी टेक्नॉलॉजीज सारख्या कंपन्यांचा समावेश आहे, ज्यांनी या वर्षी सेबीकडे त्यांचे कागदपत्रे दाखल केली आहेत.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Keep your money ready e retailer Meesho IPO is coming soon what is the company s plan See the details