Kalyan Jewellers share: भारतीय शेअर बाजार रिकव्हरी मोडमध्ये आहे. या वातावरणात, गुरुवारी कल्याण ज्वेलर्सच्या शेअरच्या किमतीत सुमारे ६% वाढ झाली. ट्रेडिंग दरम्यान, बीएसईवर शेअर ६% वाढून प्रति शेअर ५४६.५० या उच्चांकावर पोहोचला. या शेअरचा ५२ आठवड्यांचा नीचांक ३९९.२० रुपये आहे. त्याच वेळी, या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ७९४.६० रुपये आहे. या शेअरच्या दोन्ही किमती याच वर्षी होत्या. २०२१ मध्ये, या शेअरची किंमत ७५ रुपये होती. या अर्थानं, या शेअरमध्ये मोठी तेजी दिसून येत आहे.
शेअरची कामगिरी
कल्याण ज्वेलर्सच्या शेअरची किंमत एका महिन्यात ८% नं घसरली आहे परंतु सहा महिन्यांत ११% नं वाढली आहे. वार्षिक आधारावर (YTD) आधारावर हा शेअर ३०% नं घसरला आहे. दरम्यान, दीर्घ कालावधीत, कल्याण ज्वेलर्सच्या शेअरनं उत्कृष्ट परतावा दिलाय. दोन वर्षांत या शेअरनं ६०% वाढ नोंदवलीये आणि तीन वर्षांत ६७५% चा मल्टीबॅगर परतावा दिलाय.
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
कंपनीचे तिमाही निकाल
३० जून रोजी संपलेल्या तिमाहीत ज्वेलरी रिटेलर कल्याण ज्वेलर्सचा नफा ४८.७३ टक्क्यांनी वाढून २६४.०८ कोटी रुपये झाला. मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत कंपनीनं १७७.५५ कोटी रुपयांचा नफा कमावला होता. कंपनीचा ऑपरेटिंग महसूल ३१.४८ टक्क्यांनी वाढून ७२६८.४७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत ५५२७.८१ कोटी रुपये होता.
तज्ज्ञांचं म्हणणं काय?
कल्याण ज्वेलर्सच्या शेअरच्या किमतीत निगेटिव्ह प्रतिक्रिया दिसून आली. लक्ष्मीश्री इन्व्हेस्टमेंट्सचे संशोधन प्रमुख अंशुल जैन यांच्या म्हणण्यानुसार सध्याच्या पातळींवरून घसरण झाल्यानं घसरणीचा वेग वाढण्याची शक्यता आहे आणि नजीकच्या भविष्यात ₹४०० आणि त्यापेक्षा कमी किमतीचं टार्गेट गाठता येईल.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)