Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > ज्वेलरी कंपनीच्या मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल; 1 लाखावर दिला 78 लाखांचा रिटर्न

ज्वेलरी कंपनीच्या मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल; 1 लाखावर दिला 78 लाखांचा रिटर्न

Multibagger Stock India: शुक्रवारच्या व्यवहारात हा शेअर सुमारे 10 टक्क्यांनी वाढला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 20:03 IST2026-02-06T20:02:58+5:302026-02-06T20:03:49+5:30

Multibagger Stock India: शुक्रवारच्या व्यवहारात हा शेअर सुमारे 10 टक्क्यांनी वाढला.

jewellery company's multibagger share made investors rich; It gave a return of 78 lakhs on 1 lakh | ज्वेलरी कंपनीच्या मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल; 1 लाखावर दिला 78 लाखांचा रिटर्न

ज्वेलरी कंपनीच्या मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल; 1 लाखावर दिला 78 लाखांचा रिटर्न

Multibagger Stock India: भारतीय शेअर बाजारातगुंतवणूकदार नेहमीच अशा शेअर्सच्या शोधात असतात, जे दीर्घकाळात मल्टीबॅगर रिटर्न देऊ शकतील. अशाच शेअर्समध्ये आता थंगमायिल ज्वेलरीचे नाव ठळकपणे पुढे आले आहे. शुक्रवारी (6 फेब्रुवारी 2026) कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली.

शेअरमध्ये 10 टक्क्यांपर्यंत उसळी

शुक्रवारच्या व्यवहारात थंगमायिल ज्वेलरीचा शेअर सुमारे 10 टक्क्यांनी वाढून 3,491.80 रुपयांच्या इंट्रा-डे उच्चांकावर पोहोचला. दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी हा शेअर किती फायदेशीर ठरला आहे, याची प्रचिती गेल्या दहा वर्षांच्या कामगिरीतून येते.

1 लाखांचे झाले 78 लाख...

थंगमायिल ज्वेलरीने दीर्घकाळात गुंतवणूकदारांना चकित करणारे रिटर्न दिले आहेत. फेब्रुवारी 2016 मध्ये कंपनीच्या शेअरची किंमत सुमारे 89.37 रुपये होती. त्या वेळी 1 लाख रुपये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदाराला अंदाजे 1,118 शेअर्स मिळाले असते. यानंतर, जुलै 2023 मध्ये कंपनीने 1:1 बोनस शेअर्स जाहीर केले. 

म्हणजेच, प्रत्येक शेअरमागे एक बोनस शेअर मिळाला त्यामुळे शेअर्सची संख्या 2,236 झाली. 6 फेब्रुवारी 2026 रोजी शेअरची किंमत 3,491.80 रुपये झाली. त्यामुळे 2,236 शेअर्सची एकूण किंमत सुमारे 78.07 लाख रुपये झाली आहे. हा परतावा थंगमायिल ज्वेलरीला एक मजबूत मल्टीबॅगर शेअर ठरवतो.

शुक्रवारच्या व्यवहारातील स्थिती

बीएसईवर शुक्रवारी कंपनीच्या शेअर्समध्ये लक्षणीय तेजी दिसून आली. व्यवहाराच्या अखेरीस शेअर 6.31 टक्के (200.25 रुपये) वाढीसह 3,374.65 रुपये या पातळीवर बंद झाला. याचा दिवसातील इंट्रा-डे उच्चांक 3,491.80 रुपये होता. तर, 52 आठवड्यांचा उच्चांक 4,138.15 रुपये आणि नीचांक 1,526.45 रुपये होता.

(टीप-शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन आहे. कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.)

 

Web Title : ज्वेलरी कंपनी के मल्टीबैगर स्टॉक ने निवेशकों को मालामाल किया; 1 लाख पर 78 लाख का रिटर्न

Web Summary : थंगमायिल ज्वेलरी के शेयरों में उछाल, असाधारण रिटर्न दिया। 2016 में 1 लाख रुपये का निवेश फरवरी 2026 तक लगभग 78.07 लाख रुपये हो गया, बोनस शेयरों से बढ़ावा मिला। शुक्रवार को स्टॉक ₹3,374.65 पर बंद हुआ, जो इसकी मल्टीबैगर क्षमता को दर्शाता है।

Web Title : Jewelry company's multibagger stock enriches investors; ₹1 lakh yields ₹78 lakh.

Web Summary : Thangamayil Jewellery's shares surged, delivering exceptional returns. A ₹1 lakh investment in 2016 grew to approximately ₹78.07 lakh by February 2026, boosted by bonus shares. The stock closed at ₹3,374.65 on Friday, showcasing its multibagger potential.