Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > Lenskart IPO: महागडा आहे का लेन्सकार्टचा आयपीओ? व्हॅल्यूएशनवरुन उपस्थित होताहेत प्रश्न, एक्सपर्ट म्हणाले...

Lenskart IPO: महागडा आहे का लेन्सकार्टचा आयपीओ? व्हॅल्यूएशनवरुन उपस्थित होताहेत प्रश्न, एक्सपर्ट म्हणाले...

Lenskart IPO: या वर्षी ज्या कंपन्यांच्या आयपीओची गुंतवणूकदारांना प्रतीक्षा होती, त्यापैकी लेन्सकार्ट ही एक आहे. कंपनीचा आयपीओ आज ३१ ऑक्टोबरपासून खुला झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 15:44 IST2025-10-31T15:42:10+5:302025-10-31T15:44:26+5:30

Lenskart IPO: या वर्षी ज्या कंपन्यांच्या आयपीओची गुंतवणूकदारांना प्रतीक्षा होती, त्यापैकी लेन्सकार्ट ही एक आहे. कंपनीचा आयपीओ आज ३१ ऑक्टोबरपासून खुला झाला आहे.

Is Lenskart's IPO expensive Questions are being raised on valuation experts said | Lenskart IPO: महागडा आहे का लेन्सकार्टचा आयपीओ? व्हॅल्यूएशनवरुन उपस्थित होताहेत प्रश्न, एक्सपर्ट म्हणाले...

Lenskart IPO: महागडा आहे का लेन्सकार्टचा आयपीओ? व्हॅल्यूएशनवरुन उपस्थित होताहेत प्रश्न, एक्सपर्ट म्हणाले...

Lenskart IPO: या वर्षी ज्या कंपन्यांच्या आयपीओची गुंतवणूकदारांना प्रतीक्षा होती, त्यापैकी लेन्सकार्ट ही एक आहे. कंपनीचा आयपीओ आज ३१ ऑक्टोबरपासून खुला झाला आहे. गुंतवणूकदारांना ४ नोव्हेंबरपर्यंत बोली लावण्याची संधी आहे. परंतु ज्या व्हॅल्युएशनवर लेन्सकार्टचा आयपीओ आला आहे, त्यामुळे गुंतवणूकदारांच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. कंपनीचा अप्पर प्राईस बँड ४०२ रुपये आहे. वित्त वर्ष २०२५ च्या कमाईनुसार, लेन्सकार्टचा प्राईस टू अर्निंग रेश्यो (Price to Earning Ratio) २३५ ते २३८ पट अधिक आहे. हाच चर्चेचा विषय बनला आहे.

२००८ मध्ये झाली होती कंपनीची स्थापना

चष्मा बनवणाऱ्या या कंपनीची सुरुवात २००८ मध्ये झाली होती. लेन्सकार्ट सोल्यूशन्स जगभरात २८०० स्टोअरचे संचालन करत आहे. यात एकट्या भारतात २१३७ स्टोअर्स आहेत. कंपनी ग्लास, सनग्लास आणि कॉन्टॅक्ट लेन्स विकते. लेन्सकार्ट आपले उत्पादन हायब्रीड मॉडेलवर विकत आली आहे.

आर्थिक स्थिती मागील वर्षात सुधारली

वित्त वर्ष २०२५ मध्ये लेन्सकार्टचा महसूल ६६५२ कोटी रुपये राहिला होता. EBITDA ६.९ टक्क्यांवरून वाढून १४.७० टक्के झाला. वित्त वर्ष २०२३ दरम्यान लेन्सकार्टला ६४ कोटी रुपयांचा तोटा झाला होता.

इकॉनॉमिक्स टाइम्सच्या रिपोर्टनुसार, ब्रोकरेज हाऊस एसबीआय सिक्युरिटीजनं कंपनीच्या व्हॅल्युएशनवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. ब्रोकरेज हाऊसचं म्हणणं आहे की १०.१x EV/Sales आणि ६८.७x EV/EBITDA सध्या प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या तुलनेत अधिक आहे. ब्रोकरेज हाऊसचं मत आहे की कंपनीची लिस्टिंग सुस्त होऊ शकते. ब्रोकरेज हाऊस निर्मल बंगनं व्हॅल्युएशनबाबत जवळपास तीच गोष्ट पुन्हा सांगितली आहे.

कंपनीसाठी 'गेमचेंजर' काय असू शकते?

सध्याच्या काळात चष्म्याशी संबंधित बाजार भारतात ७४,००० कोटी रुपयांचा आहे. जो वित्त वर्ष २०३० मध्ये १.४८ लाख कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो. या वाढत्या मार्केटवर वर्चस्व करण्यासाठी लेन्सकार्ट चांगल्या स्थितीत आहे. कंपनीचा टेक्नॉलॉजी फर्स्ट ॲप्रोच त्यांच्यासाठी गेमचेंजर सिद्ध होऊ शकतो.

कंपनीची पुढील ३ वर्षांत ६२० नवीन स्टोअर्स उघडण्याची योजना आहे. कंपनी छोट्या शहरांना लक्ष्य करत आहे. कंपनीचा प्लॅन उत्कृष्ट आहे. परंतु, जर हा प्लॅन प्रत्यक्षात उतरवताना काही अडचण आली, तर लेन्सकार्टच्या अडचणी वाढतील. शेअर बाजारात कंपनीला संघर्ष करताना पाहिले जाऊ शकते. तज्ज्ञांचे मत आहे की गुंतवणूकदारांनी या आयपीओवर बोली लावण्यापूर्वी दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करावा लागेल.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title : लेंसकार्ट आईपीओ: क्या महंगा है? मूल्यांकन पर सवाल, विशेषज्ञों की राय

Web Summary : लेंसकार्ट के आईपीओ का मूल्यांकन सवालों के घेरे में है, जिसका मूल्य-से-आय अनुपात अधिक है। राजस्व वृद्धि और विस्तार योजनाओं के बावजूद, विश्लेषकों ने प्रतिस्पर्धियों की तुलना में संभावित रूप से बढ़े हुए मूल्यांकन के कारण सावधानी बरतने का सुझाव दिया है। दीर्घकालिक निवेश की सलाह दी जाती है।

Web Title : Lenskart IPO: Overpriced? Valuation Concerns Raised; Experts Weigh In

Web Summary : Lenskart's IPO faces valuation questions, with a high price-to-earnings ratio. Despite strong revenue growth and expansion plans, analysts suggest caution due to potentially inflated valuation compared to competitors. Long-term investment is advised.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.