Lokmat Money >शेअर बाजार > पैसा तयार ठेवा; गुंतवणुकीची मोठी संधी, पुढील आठवड्यात येणार 'या' 9 कंपन्याचे IPO

पैसा तयार ठेवा; गुंतवणुकीची मोठी संधी, पुढील आठवड्यात येणार 'या' 9 कंपन्याचे IPO

IPO Next Week: 2024 च्या शेवटच्या महिन्यात IPO मार्केटने गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी आणली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 17:11 IST2024-12-08T17:08:19+5:302024-12-08T17:11:04+5:30

IPO Next Week: 2024 च्या शेवटच्या महिन्यात IPO मार्केटने गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी आणली आहे.

IPO Next Week: Keep Money Ready; Big investment opportunity, IPO of 'these' 9 companies coming next week | पैसा तयार ठेवा; गुंतवणुकीची मोठी संधी, पुढील आठवड्यात येणार 'या' 9 कंपन्याचे IPO

पैसा तयार ठेवा; गुंतवणुकीची मोठी संधी, पुढील आठवड्यात येणार 'या' 9 कंपन्याचे IPO

IPO Latest News: शेअर बाजारातगुंतवणूक करणाऱ्यांसाठी 2024 चा शेवटचा महिना मोठी संधी घेऊन आला आहे. या वर्षी आलेल्या IPO मध्ये तुम्ही गुंतवणूक केली नसेल, तर पुढच्या आठवड्यात तुम्हाला बंपर कमाई करण्याची संधी आहे. पुढील आठवड्यात एक-दोन नव्हे, तर एकूण 9 IPO शेअर बाजारात दाखल होणार आहेत. यापैकी मेनबोर्ड श्रेणीतील 4 मोठे IPO आहेत, ज्यात विशाल मेगा मार्ट (Vishal Mega Mart) आणि मोबिक्विक  (Mobikwik) सारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. याशिवाय एसएमई श्रेणीचे 5 आयपीओही बाजारात येणार आहेत.

विशाल मेगा मार्ट IPO
विशाल मेगा मार्ट या सुपरमार्केट चेन कंपनीचा IPO 11 डिसेंबर ते 13 डिसेंबर दरम्यान सबस्क्रिप्शनसाठी खुला असेल. या IPO च्या माध्यमातून कंपनी 8,000 कोटी रुपये उभारण्याचा विचार करत आहे. यामध्ये 102.56 कोटी शेअर्स ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत जारी केले जातील. त्याचा प्राइस बँड 74 ते 78 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे आणि त्याची लॉट साइज 190 शेअर्स आहे. म्हणजेच, गुंतवणूकदारांना किमान 14,820 रुपये गुंतवावे लागतील. या IPO ची लिस्टिंग 18 डिसेंबर रोजी होणार आहे.

साई लाइफ सायन्सेस लिमिटेडचा IPO
साई लाइफ सायन्सेस लिमिटेडचा IPO 11 ते 13 डिसेंबर दरम्यान उघडेल. कंपनीने 3,042.62 कोटी रुपये उभारण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यामध्ये 950 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स आणि 2,092.62 कोटी रुपयांचे शेअर्स ऑफर फॉर सेलद्वारे जारी केले जातील. या IPO ची किंमत 522 रुपये ते 549 रुपये प्रति शेअर आहे आणि त्याची लॉट साइज 27 शेअर्स असेल. गुंतवणूकदारांना किमान 14,823 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. या IPO ची लिस्टिंग 18 डिसेंबर रोजी होणार आहे.

मोबिक्विक IPO
वन मोबिक्विक सिस्टिम्स लिमिटेडचा IPO 11 डिसेंबर ते 13 डिसेंबर दरम्यान उघडेल. हा IPO 572 कोटी रुपयांचा आहे, ज्यामध्ये 2.05 कोटी नवीन शेअर्स जारी केले जातील. त्याची किंमत 265 रुपये ते 279 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे, तर गुंतवणूकदारांना किमान 53 शेअर्ससाठी बोली लावावी लागेल. 

इन्व्हेंटुरस नॉलेज सॉल्यूशंस लिमिटेड आईपीओ

इन्व्हेंटुरस नॉलेज सॉल्यूशंस लिमिटेडचा IPO 12 डिसेंबर ते 16 डिसेंबर दरम्यान उघडेल. हा संपूर्णपणे ऑफर फॉर सेल (OFS) द्वारे 1.88 कोटी शेअर जारी करेल. कंपनीने अद्याप प्राइस बँड जाहीर केलेला नाही. त्याची संभाव्य लिस्टिंग 19 डिसेंबर रोजी होणार आहे.

पुढील आठवड्यात SME विभागात एकूण 5 IPO लॉन्च होणार आहेत.
धनलक्ष्मी क्रॉप सायन्स IPO: 23.80 कोटी रुपयांचा हा IPO 9 डिसेंबर ते 11 डिसेंबर दरम्यान उघडेल.
जंगल कॅम्प्स इंडिया आयपीओ: 29.42 कोटी रुपयांचा हा IPO 10 डिसेंबर ते 12 डिसेंबर दरम्यान उघडेल.
टॉस द कॉईन आयपीओ: 9.17 कोटी रुपयांचा हा आयपीओ 9 डिसेंबर ते 11 डिसेंबर या कालावधीत सबस्क्रिप्शनसाठी उपलब्ध असेल.
पर्पल युनायटेड सेल्स आयपीओ: 32.81 कोटी रुपयांचा हा IPO 10 डिसेंबर ते 12 डिसेंबर दरम्यान उघडेल.
सुप्रीम फॅसिलिटी मॅनेजमेंट आयपीओ: 50 कोटी रुपयांचा हा आयपीओही बाजारात येईल.

(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)
 

Web Title: IPO Next Week: Keep Money Ready; Big investment opportunity, IPO of 'these' 9 companies coming next week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.