Lokmat Money >शेअर बाजार > ₹११७ कोटींची ऑर्डर मिळताच 'या' स्मॉलकॅप शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; तुमच्याकडे आहे का..?

₹११७ कोटींची ऑर्डर मिळताच 'या' स्मॉलकॅप शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; तुमच्याकडे आहे का..?

इराण आणि इस्रायलने युद्धविराम जाहीर केल्यामुळे मंगळवारी भारतीय शेअर बाजाराला संजीवनी मिळाली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 16:05 IST2025-06-24T16:05:08+5:302025-06-24T16:05:54+5:30

इराण आणि इस्रायलने युद्धविराम जाहीर केल्यामुळे मंगळवारी भारतीय शेअर बाजाराला संजीवनी मिळाली.

Investors were blown away by this small-cap stock after receiving orders worth ₹117 crore; Do you have it? | ₹११७ कोटींची ऑर्डर मिळताच 'या' स्मॉलकॅप शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; तुमच्याकडे आहे का..?

₹११७ कोटींची ऑर्डर मिळताच 'या' स्मॉलकॅप शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; तुमच्याकडे आहे का..?

Smallcap Share: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले इराण-इस्रायल युद्ध आज अखेर थांबले. दोन्ही देशांनी युद्धविराम जाहीर केल्यामुळे मंगळवारी(दि.२४) भारतीय शेअर बाजाराला संजीवनी मिळाली. त्यामुळेच सेन्सेक्स निर्देशांक ९०० अंकांच्या वाढीसह उघडला. या दरम्यान, स्मॉल कॅप कंपनी एचजी इन्फ्रा इंजिनिअरिंग लिमिटेडच्या (HG Infra Engineering) शेअर्समध्ये ५% पर्यंत वाढ झाली आहे.

या वाढीसह आज हा शेअर १०६७ रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. चांगल्या वाढीमुळे कंपनीचे मार्केट कॅपही ६,८६९.६९ कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. दरम्यान, आजच्या मोठ्या वाढीमागील कारण कंपनीला मिळालेला मोठा ऑर्डर असल्याचे मानले जाते.

भारतीय लष्कराच्या मिलिटरी इंजिनिअर सर्व्हिसेस विभागाने मुंबईतील नेव्हल डॉकयार्डमधील एका महत्त्वाच्या प्रकल्पासाठी बोली लावली होती, ज्यामध्ये अनेक कंपन्यांनी सहभाग घेतला होता. एचजी इन्फ्रा इंजिनिअरिंगचाही त्यात समावेश होता. एचजी इन्फ्राने या प्रकल्पासाठी सर्वात कमी बोली लावून प्रकल्प आपल्या नावे केला. या प्रकल्पाची एकूण किंमत ११७.७७ कोटी रुपये आहे. एचजी इन्फ्रा कंपनीला पुढील ३० महिन्यांत मटेरियल हँडलिंग सुविधा विकसित करायची आहे. 

एचजी इन्फ्रा शेअर ६४% ने वाढू शकतो!
एचजी इन्फ्रा इंजिनिअरिंग कंपनी ही पायाभूत सुविधा बांधकाम क्षेत्रातील वेगाने वाढणारी कंपनी आहे. कंपनी प्रामुख्याने अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकामाशी संबंधित प्रकल्पांमध्ये व्यवहार करते. ट्रेडलाइन वेबसाइटनुसार, एचजी इन्फ्रा इंजिनिअरिंग कंपनीच्या स्टॉकची सरासरी लक्ष्य किंमत १६६१ रुपये आहे. हे स्टॉकच्या सध्याच्या पातळीपेक्षा ६४% अधिक आहे. बहुतांश विश्लेषकांनी या स्टॉकवर 'मजबूत खरेदी'ची शिफारस केली आहे.

(टीप-शेअर बाजारातगुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: Investors were blown away by this small-cap stock after receiving orders worth ₹117 crore; Do you have it?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.