Lokmat Money >शेअर बाजार > १७ रुपयांच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या, दिलाय ४६६१ टक्के मल्टीबॅगर परतावा; तुमच्याकडे आहे का? 

१७ रुपयांच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या, दिलाय ४६६१ टक्के मल्टीबॅगर परतावा; तुमच्याकडे आहे का? 

या स्टॉकने गेल्या ३ वर्षात ४८५ टक्के तर २०१८ मध्ये सूचीबद्ध झाल्यापासून ४,६६१ टक्के एवढा मल्टीबॅगर परतावा दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 17:34 IST2025-01-16T17:33:07+5:302025-01-16T17:34:30+5:30

या स्टॉकने गेल्या ३ वर्षात ४८५ टक्के तर २०१८ मध्ये सूचीबद्ध झाल्यापासून ४,६६१ टक्के एवढा मल्टीबॅगर परतावा दिला आहे.

Investors jump on hardwyn Rs 17 share, gave 4661 percent multibagger return; Do you have it | १७ रुपयांच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या, दिलाय ४६६१ टक्के मल्टीबॅगर परतावा; तुमच्याकडे आहे का? 

१७ रुपयांच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या, दिलाय ४६६१ टक्के मल्टीबॅगर परतावा; तुमच्याकडे आहे का? 

शेअर बाजारात आज (गुरुवार) व्यवहारादरम्यान स्मॉल-कॅप कंपनी हार्डविनचे ​​शेअर्स फोकसमध्ये होते. कंपनीचा शेअर आज ५% ने वधारून १७.५९ रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचला. या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ३४.५८ रुपये प्रति शेअर, तर नीचांक १५.२४ रुपये प्रति शेअर एवढा आहे. कंपनीचा शेअर बीएसई आणि एनएसई दोन्हींवरही सूचीबद्ध आहेत. 

या स्टॉकने गेल्या ३ वर्षात ४८५ टक्के तर २०१८ मध्ये सूचीबद्ध झाल्यापासून ४,६६१ टक्के एवढा मल्टीबॅगर परतावा दिला आहे. कंपनीच्या विद्यमान शेअरहोल्डिंग पॅटर्नमध्ये प्रमोटर्सचा ४३.७७ टक्के, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा (एफआयआय) 0.0७ टक्के, सरकारचा 0.४६ टक्के, तर जनतेचा ५५.७0 टक्के वाटा आहे. कंपनीचे मार्केट कॅप ८३४ कोटी रुपये एवढे आहे.

कंपनीचे तिमाही निकाल -
तिमाही परिणामांनुसार, Q२FY२४ च्या तुलनेत Q२FY२५ मध्ये नेट सेल्स ६२ टक्क्यांनी वाढून ५१.६५ कोटी रुपये आणि निव्वळ नफा २0१ टक्क्यांनी वाढून ४.0४ कोटी रुपये झाला आहे. आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत H१FY२४ च्या तुलनेत H१FY२५ मध्ये शुद्ध विक्री ३५ टक्क्यांनी वाढून ९२.५७ कोटी रुपये आणि शुद्ध लाभ १0८ टक्क्यांनी वाढून ५.३८ कोटी रुपये झाला आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
 

Web Title: Investors jump on hardwyn Rs 17 share, gave 4661 percent multibagger return; Do you have it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.