Share Market Today : भारतीय शेअर बाजारात सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर आज, गुरुवार, ११ डिसेंबर रोजी पुन्हा तेजी परतली. अमेरिकेत व्याजदरात कपात होण्याची शक्यता आणि भारत-अमेरिका यांच्यात लवकरच व्यापार करार होण्याची आशा यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला. सकाळी काही काळ बाजार लाल निशाणीवर गेला असला तरी, त्याने लगेचच सावरत मोठी झेप घेतली.
गुंतवणूकदारांनी कमावले २.५४ लाख कोटी रुपये
बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली. बीएसईमध्ये लिस्टेड कंपन्यांचे एकूण मार्केट कॅपिटलायझेशन आज वाढून ४६६.६२ लाख कोटी रुपयांवर पोहोचले, जे काल ४६४.०८ लाख कोटी रुपये होते. तर म्हणजेच, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आज एकाच दिवसात सुमारे २.५४ लाख कोटींची वाढ झाली.
ऑटो आणि मेटल शेअर्समध्ये मोठी खरेदी
आजच्या तेजीमध्ये ब्रॉडर मार्केटनेही चांगली कामगिरी केली. बीएसई मिड-कॅप इंडेक्स ०.७९% आणि स्मॉल-कॅप इंडेक्स ०.५१% च्या वाढीसह बंद झाले. आजच्या व्यवहारात ऑटो, मेटल, आयटी आणि टेलिकॉम शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाली. याशिवाय हेल्थकेअर, फार्मा आणि रिअल्टी शेअर्समध्येही चांगली वाढ दिसली. केवळ ऑईल ॲन्ड गॅस हा एकमेव सेक्टर लाल निशाणीवर बंद झाला.
सेन्सेक्समधील टॉप गेनर्स
- सेन्सेक्सच्या ३० पैकी २१ शेअर्स आज वाढीसह बंद झाले.
- इटरनल : २.७४% वाढीसह सर्वाधिक तेजी.
- टाटा स्टील, कोटक महिंद्रा बँक, अल्ट्राटेक सिमेंट आणि मारुती सुझुकी हे शेअर्स १.२३% ते २.५६% पर्यंत वाढले.
सेन्सेक्समधील टॉप लूजर्स
- सेन्सेक्समधील ९ शेअर्समध्ये घसरण नोंदवली गेली.
- एशियन पेंट्स : ०.९६% घसरणीसह टॉप लूजर्स राहिला.
- भारती एअरटेल, बजाज फायनान्स, पॉवरग्रिड आणि ॲक्सिस बँक या शेअर्समध्ये ०.२२% ते ०.९६% पर्यंत घसरण झाली.
वाचा - लेकीचं भविष्य 'सेफ' करण्यासाठी करा 'या' ६ ठिकाणी गुंतवणूक! मिळवा सर्वाधिक परतावा आणि टॅक्समध्ये सूट
आजच्या बाजाराची आकडेवारी
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर आज एकूण ४,३४१ शेअर्समध्ये व्यवहार झाला. त्यापैकी २,४५० शेअर्स तेजीसह बंद झाले, तर केवळ १,७४१ शेअर्समध्ये घसरण झाली. याशिवाय, ८५ शेअर्सनी आपला नवीन ५२ आठवड्यांचा गाठला.
