Lokmat Money >शेअर बाजार > टाटा स्टीलसह 'हे' शेअर्स तेजीत! अमेरिकेच्या ‘टॅरिफ’ तणावातही बाजाराची झेप! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ

टाटा स्टीलसह 'हे' शेअर्स तेजीत! अमेरिकेच्या ‘टॅरिफ’ तणावातही बाजाराची झेप! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ

Stock Market : शेअर बाजाराने दिवसाची सुरुवात कमकुवत झाली. पण, नंतर बाजारात खरेदीचा कल वाढला, ज्यामुळे दोन्ही प्रमुख निर्देशांक हिरव्या चिन्हात बंद झाले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 17:10 IST2025-09-03T17:10:24+5:302025-09-03T17:10:24+5:30

Stock Market : शेअर बाजाराने दिवसाची सुरुवात कमकुवत झाली. पण, नंतर बाजारात खरेदीचा कल वाढला, ज्यामुळे दोन्ही प्रमुख निर्देशांक हिरव्या चिन्हात बंद झाले.

Indian Stock Market Rallies Sensex, Nifty End with Strong Gains | टाटा स्टीलसह 'हे' शेअर्स तेजीत! अमेरिकेच्या ‘टॅरिफ’ तणावातही बाजाराची झेप! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ

टाटा स्टीलसह 'हे' शेअर्स तेजीत! अमेरिकेच्या ‘टॅरिफ’ तणावातही बाजाराची झेप! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ

Stock Market : एका बाजूला अमेरिकेच्या ‘टॅरिफ’ धोरणांमुळे बाजारात तणाव असतानाही, बुधवारी (३ सप्टेंबर) देशांतर्गत शेअर बाजार तेजीसह बंद झाला. खरेदीदारांचा जोरदार कल दिसल्याने बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेक्स ४०९.८३ अंकांच्या वाढीसह ८०,५६७.७१ च्या पातळीवर बंद झाला. त्याचप्रमाणे, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी १३५.४५ अंकांच्या वाढीसह २४,७१५.०५ वर स्थिरावला. दिवसभर झालेल्या व्यवहारात एकूण २,४१५ शेअर्समध्ये वाढ झाली, तर १,३३३ शेअर्समध्ये घट नोंदवली गेली. ११६ शेअर्सचे भाव मात्र स्थिर राहिले.

टाटा स्टीलमध्ये सर्वात जास्त तेजी
सेन्सेक्समधील शेअर्समध्ये टाटा स्टीलने सर्वाधिक ५.९०% ची वाढ नोंदवली. याशिवाय, टायटन, महिंद्रा अँड महिंद्रा, आयटीसी, स्टेट बँक ऑफ इंडिया, ट्रेंट आणि इटरनल यांसारख्या शेअर्समध्येही मोठी वाढ दिसून आली. दुसरीकडे, इन्फोसिस, एनटीपीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर, टीसीएस, अदाणी पोर्ट्स आणि भारती एअरटेल यांसारख्या शेअर्समध्ये मात्र घसरण झाली.

तज्ज्ञांचे मत आणि जीएसटीचा परिणाम
जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे रिसर्च प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले की, नजीकच्या काळात बाजाराची दिशा जीएसटी कौन्सिलच्या बैठकीच्या निकालांवर अवलंबून असेल. विशेषतः उपभोग-आधारित क्षेत्रांवर गुंतवणूकदारांचे लक्ष केंद्रित झाले आहे. सध्या दिल्लीमध्ये दोन दिवसीय जीएसटी कौन्सिलची बैठक सुरू आहे, ज्यात टॅक्स स्लॅब ५% आणि १८% पर्यंत मर्यादित ठेवण्याच्या प्रस्तावावर चर्चा केली जात आहे. या संभाव्य बदलामुळे उपभोग-आधारित क्षेत्रांना चालना मिळण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

वाचा - AI मुळे नोकऱ्या धोक्यात? 'या' टेक कंपनीने एका झटक्यात ४,००० कर्मचाऱ्यांना काढले बाहेर!

डॉलरच्या तुलनेत रुपया ९ पैशांनी मजबूत
बुधवारी देशांतर्गत शेअर बाजारातील तेजी, कच्च्या तेलाच्या किमतींमधील नरमपणा आणि कमकुवत झालेल्या अमेरिकन डॉलर इंडेक्समुळे रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ९ पैशांनी मजबूत होऊन ८८.०६ (अंतिम) वर बंद झाला. यापूर्वी रुपया आपल्या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला होता, पण दिवसअखेर त्यात काही प्रमाणात सुधारणा दिसून आली. फॉरेक्स ट्रेडर्सच्या मते, भारत आणि अमेरिकेदरम्यान व्यापार शुल्कावरून सुरू असलेला तणाव आणि परदेशी भांडवलादारांकडून होणारी विक्री यामुळे रुपया अजूनही आपल्या विक्रमी नीचांकी पातळीच्या आसपासच आहे. इंटरबँक विदेशी मुद्रा बाजारात रुपया ८८.१५ वर उघडला होता. दिवसभरात तो ८८.१९ च्या नीचांकी पातळीवर गेला, तर ८७.९८ च्या उच्चांकी पातळीवर पोहोचला.

Web Title: Indian Stock Market Rallies Sensex, Nifty End with Strong Gains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.