Lokmat Money >शेअर बाजार > टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?

टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?

Indian Stock Market : मंगळवारी बाजार जोरदार वाढीसह बंद झाला. काल, सेन्सेक्स ५९४.९५ अंकांनी वाढून ८२,३८०.६९ वर बंद झाला आणि निफ्टी १६९.९० अंकांनी वाढून २५,२३९.१० वर बंद झाला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 17:20 IST2025-09-17T17:20:35+5:302025-09-17T17:20:35+5:30

Indian Stock Market : मंगळवारी बाजार जोरदार वाढीसह बंद झाला. काल, सेन्सेक्स ५९४.९५ अंकांनी वाढून ८२,३८०.६९ वर बंद झाला आणि निफ्टी १६९.९० अंकांनी वाढून २५,२३९.१० वर बंद झाला.

Indian Stock Market Rallies for Second Straight Day; Sensex Closes Higher | टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?

टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?

Indian Stock Market : भारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी दिसून आली. बुधवारचा (१७ सप्टेंबर) दिवस शेअर बाजारासाठी लाभदायक ठरला. दिवसभरच्या चढ-उतारानंतर बाजाराने वाढीसह व्यवहार बंद केला. बीएसई सेन्सेक्स ३१३.०२ अंकांच्या वाढीसह ८२,६९३.७१ अंकांवर बंद झाला. त्याचप्रमाणे, एनएसईचा निफ्टी ५० निर्देशांकही ९१.१५ अंकांच्या तेजीसह २५,३३०.२५ अंकांवर स्थिरावला.

याआधी, मंगळवारी शेअर बाजार शानदार तेजीसह बंद झाला होता. काल सेन्सेक्स ५९४.९५ अंकांनी आणि निफ्टी १६९.९० अंकांनी वाढला होता.

सेंसेक्समधील २० तर निफ्टीमधील ३४ कंपन्यांचे शेअर्स हिरव्या निशाण्यावर
आज सेन्सेक्समधील ३० पैकी २० कंपन्यांचे शेअर्स वाढीसह हिरव्या निशाण्यावर बंद झाले, तर उर्वरित १० कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह लाल निशाण्यावर बंद झाले. निफ्टी ५० मध्येही ५० पैकी ३४ कंपन्यांचे शेअर्स वाढले, तर १६ शेअर्समध्ये घट दिसून आली. आज सेन्सेक्समध्ये सर्वाधिक वाढ भारतीय स्टेट बँकच्या शेअरमध्ये (३.०२%) दिसून आली. तर, बजाज फिनसर्व्हच्या शेअरमध्ये (०.९९%) सर्वाधिक घसरण झाली.

या प्रमुख कंपन्यांचे शेअर्स वाढीसह बंद झाले
आज तेजीसह बंद होणाऱ्या सेन्सेक्समधील इतर प्रमुख कंपन्यांमध्ये बीईएल (२.३६%), कोटक महिंद्रा बँक (१.४३%), मारुती सुझुकी (१.३५%), ट्रेंट (१.२१%) आणि अल्ट्राटेक सिमेंट (१.२०%) यांचा समावेश होता. याशिवाय, टीसीएस, टाटा मोटर्स, इन्फोसिस, महिंद्रा अँड महिंद्रा आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांसारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्येही वाढ नोंदवली गेली.


 

घसरणीसह बंद झालेले शेअर्स
दुसरीकडे, टायटन (-०.९८%), आयटीसी (-०.९३%), टाटा स्टील (-०.४४%) आणि पॉवरग्रिड (-०.४२%) यांसारख्या कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह बंद झाले.

 

Web Title: Indian Stock Market Rallies for Second Straight Day; Sensex Closes Higher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.