Share Market Latest Updates: बुधवारी भारतीय शेअर बाजारातील आठ दिवसांच्या घसरणीला ब्रेक लागल्याने गुंतवणूकदारांना मोठा दिलासा होता. मात्र, हा उत्साह फार काळ टिकला नाही. गांधी जयंतीच्या सुट्टीनंतर शेअर बाजारात शुक्रवारी पुन्हा एकदा घसरणीसह व्यवहाराला सुरुवात झाली. आंतरराष्ट्रीय बाजारातील संमिश्र संकेतामुळे बाजारात अस्थिरतेचे वातावरण दिसून आले.
सुरुवातीची स्थिती: ३० अंकांच्या बीएसई सेन्सेक्स २९९.१७ अंकांच्या घसरणीसह ८०,६८४.१४ वर उघडला. तर, निफ्टी ५० निर्देशांक ७६.७५ अंकांच्या घसरणीसह २४,७५९.५५ वर उघडला.
सध्याचे व्यवहार (सकाळ ९:२५ पर्यंत): शेअर बाजारात विक्रीचा दबाव कायम होता. सेन्सेक्स ९७.५० अंकांनी घसरून ८०,८८१ वर, तर निफ्टी ६४.४० अंकांनी घसरून २४,७७१.९० अंकांवर व्यवहार करत होता.
कोणत्या शेअर्समध्ये तेजी-मंदी?
सकाळच्या सत्रात काही निवडक शेअर्समध्ये खरेदीचा जोर कायम होता, तर बाजारात व्यापक पातळीवर विक्रीचा दबाव दिसून आला.
तेजी असलेले शेअर्स (हिरवे निशाण) | घसरण असलेले शेअर्स (लाल निशाण) |
टाटा स्टील | बजाज फायनान्स |
टाटा मोटर्स | महिंद्रा ॲन्ड महिंद्रा |
ॲक्सिस बँक | मारुती सुझुकी |
बीईएल |
बुधवारचा उत्साह टिकला नाही
यापूर्वी, बुधवारच्या (१ ऑक्टोबर) सत्रात बाजारात मोठी तेजी नोंदवली गेली होती, ज्यामुळे सलग आठ दिवसांची घसरण थांबली होती.
मागणीचे कारण: भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या निर्णयामुळे बाजारात आत्मविश्वास वाढला होता. आरबीआयने रेपो दर ५.५ टक्क्यांवर कायम ठेवल्यामुळे गुंतवणूकदारांनी बँकिंग सेक्टरमध्ये मोठी खरेदी केली होती.
तेजी : सेन्सेक्स ७१५ अंकांनी, तर निफ्टी २२५ अंकांनी वाढून बंद झाला होता.
गुंतवणूकदारांनी बुधवारच्या खरेदीनंतर नफावसुली सुरू केल्यामुळे आज बाजारात पुन्हा अस्थिरता दिसून येत आहे.
वाचा - IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय
जागतिक बाजारातील चित्र
- जागतिक बाजारातील संमिश्र संकेतांचा परिणाम भारतीय बाजारावर दिसून येत आहे.
- अमेरिका: गुरुवारी अमेरिकेतील वॉल स्ट्रीटमध्ये तेजी कायम राहिली आणि इक्विटीने नवीन उच्चांक गाठला.
- आशियाई बाजार: आशियाई बाजारपेठांमध्ये संमिश्र व्यापार दिसून आला. जपानचा निक्केई निर्देशांक ०.४२ टक्क्यांनी वाढला, तरीही जपानचा बेरोजगारी दर २.६ टक्क्यांवर पोहोचल्याने चिंता कायम आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाचा एसॲंडपी/एस्क्स २०० निर्देशांक ०.१७ टक्क्यांनी घसरला.
- चीन आणि दक्षिण कोरियाचे बाजार सुट्टीमुळे आज बंद आहेत.